ट्विंकल खन्नाने केला खुलासा, ती आणि पती अक्षयकुमार बेडरूममध्ये अखेर काय करतात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 21:11 IST
अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना तिच्या सेंस आॅफ ह्युमरसाठी ओळखली जाते. नुकताच एका लीडिंग न्यूजपेपरमध्ये तिचे एक आर्टिकल पब्लिश ...
ट्विंकल खन्नाने केला खुलासा, ती आणि पती अक्षयकुमार बेडरूममध्ये अखेर काय करतात?
अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना तिच्या सेंस आॅफ ह्युमरसाठी ओळखली जाते. नुकताच एका लीडिंग न्यूजपेपरमध्ये तिचे एक आर्टिकल पब्लिश झाले. ज्यामध्ये खुलासा करण्यात आला की, ती आणि अक्षयकुमार बेडरूममध्ये काय करतात? वास्तविक तिने या आर्टिकलच्या माध्यमातून हे सांगितले की, आम्ही बेडरूममध्ये गेल्यानंतर सर्वात अगोदर डास मारण्याचे काम करतो. शिवाय यावरही लक्ष देतो की, रूमच्या खिडक्या उघड्या तर नाहीत ना! ट्विंकल नेहमीच तिच्या विचारांनी इतरांना अट्रॅक्ट करीत असते. या कॉलमच्या माध्यमातूनही तिने लोकांना अट्रॅक्ट केले आहे. या कॉलमला तिने ‘ब्लू व्हेल गेम’ असे नाव दिले आहे. या गेममुळे अनेकांचा जीव गेला आहे. तिने या कॉलममध्ये अतिशय मजेशीर अंदाजात खुलासा करताना सांगितले की, ‘जसा मुलगा त्याच्या मित्राच्या बर्थ डे पार्टीसाठी घरातून बाहेर पडला तोच आम्ही मुलीला घेऊन बेडरूममध्ये गेलो. बेडरूममध्ये गेल्यानंतर आम्ही एक गेम खेळण्याचा विचार केला, आणि आम्ही डास मारण्याचा गेम सुरू केला. मी माझ्या पतीच्या हातात इलेक्ट्रॉनिक रेकॅट दिले, जेणेकरून त्यांनी डास मारण्यास सुरुवात करावी. ट्विंकलने आर्टिकलमध्ये हादेखील खुलासा केला की, तिने मुलगा आरवच्या बर्थ डेवर गेल्यावर्षी त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक केली होती. तिने लिहिले की, आरवने यावर्षी मला म्हटले, मॉम, तू केकवर माझ्या नावाचे स्पेलिंग बरोबर लिहिशील. कारण गेल्यावर्षी तू माझ्या नावाचे स्पेलिंग चुकीचे लिहिले होते. शिवाय याबाबतचा खुलासा करताना म्हटले होते की, हॉटेलचा शेफ शिवसेनेचा मेंबर असावा. त्यामुळेच त्याने स्पेलिंग चुकीचे लिहिले. अक्षयकुमारने नुकतेच एका मुलाखत दिली. यावेळी त्याला विचारण्यात आले होते की, ‘तुझी पत्नी चांगली लेखिका आहे. शिवाय तुझ्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाची निर्माता म्हणून कामही पाहत आहे. आगामी काळात ती कॉमेडी चित्रपटाची कथा लिहू शकणार काय?’ याचे उत्तर देताना अक्षयने म्हटले होते की, ते हे सर्व काही आरामात करणार आहे. ती माझ्या पूर्णपणे अपोझिट आहे. ती माझ्यासारखी वर्षातून चार चित्रपट करीत नाही. सध्या ती चित्रपट एन्जॉय करीत आहे.