बी-टाऊनमध्ये वेगळी ओळख मिळवण्यासाठी झरीननं काय केलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2016 10:58 IST
बॉलीवुड अभिनेत्री झरीन खाननं आपल्या वजनाबाबत एक विधान केलंय. कुणाच्या दबावात येऊन वजन कमी केलं नसल्याचं झरीननं म्हटलंय. आजवर ...
बी-टाऊनमध्ये वेगळी ओळख मिळवण्यासाठी झरीननं काय केलं
बॉलीवुड अभिनेत्री झरीन खाननं आपल्या वजनाबाबत एक विधान केलंय. कुणाच्या दबावात येऊन वजन कमी केलं नसल्याचं झरीननं म्हटलंय. आजवर बॉलीवुडमध्ये मिळवलेलं यश आणि ओळख आपल्या मेहनतीवर मिळवल्याचा दावाही झरीननं केलाय. बॉलीवुडमध्ये एंट्री मारण्यासाठी तिनं आपलं तब्बल 43 किलो वजन घटवलंय. हे कुणाच्या सांगण्यावरुन आणि दबावातून केलं नसल्याचं तिनं म्हटलंय. आपण कायम फिट राहण्याचा प्रयत्न केल्याचंही झरीननं म्हटलंय.