Join us

हनिमूननंतर आता काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2016 15:23 IST

अभिनेता करण सिंग ग्रोव्हर आणि अभिनेत्री बिपाशा बासू सध्या मालदिव येथे हनिमूनला गेले आहेत. हनिमूननंतर करणच्या संपूर्ण करियरचा ताबा ...

अभिनेता करण सिंग ग्रोव्हर आणि अभिनेत्री बिपाशा बासू सध्या मालदिव येथे हनिमूनला गेले आहेत. हनिमूननंतर करणच्या संपूर्ण करियरचा ताबा आपल्या हातात घ्यायचा असे बिपाशाने ठरवले आहे. करणचे डाएट, केशरचना, त्याचे कपडे यांवर आता स्वतः बिपाशा बारीक लक्ष ठेवणार आहे. करणचा नवीन पोर्टफोलिओ बनवून तोही ती अनेक प्रोडक्शन हाऊसमध्ये पाठवणार आहे. करण छोट्या पडद्यावर प्रसिद्ध असला तरी त्याला एकही हिट चित्रपट देता आला नाही. त्यामुळे आता करणच्या करियरसाठी बिपाशाने मेहनत घ्यायची ठरवली आहे.