Join us

जहाँ तुम चले गये ! चिरंजीवी सरजाच्या निधनानंतर लग्नाचा व्हिडीओ होतोय व्हायरल,दोन वर्षापूर्वीच अडकले होते लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 14:52 IST

चिरंजीवीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्याने पत्नी मेघना राज आणि कुटुबियांना कायमचे अलिवदा म्हटले.

कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजाने वयाच्या 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, हृदय विकाराच्या झटक्याने मालवली प्राणज्योत चिरंजीवी यांच्या अकाली निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. चिंरजीवीची पत्नी गरोदर आहे. बाळाचा चेहरा बघण्यापूर्वीच घेतला जगाचा निरोप  दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. 2 मे 2018 रोजी कन्नड अभिनेत्री मेघना राजसोबत लग्न केले होते.मेघना राज ही देखील कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

दोघेही आपल्या पहिल्या बाळाच्या जन्माची वाट पाहात होते.लग्नानंतर आता चिरंजीवी आणि मेघनाच्या लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही अश्रु अनावर झाले आहेत. चिरंजीवी आज आपल्यात नाही हा विचारही करवत नसून असे काही घडले असेल अशा धक्क्यातच चाहते आहेत.

मेघना आणि चिरंजीवी एकमेकांसोबत  एन्जॉय करत होते. चिरंजीवीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकल्यास आपणास असे बरेच फोटो मिळतील ज्यात या दोघांमध्ये घट्ट आणि रोमांटीक केमिस्ट्री पाहायला मिळेल. या दोघांचे लग्नही धुमधडाक्यात पार पडले होते.  पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात चिरंजीवी आणि मेघना यांचा पेहरावसुद्धा तितकाच खास होता.

 

आकर्षक अशा वेडींग गाऊनमध्ये नववधू मेघनाचं सौंदर्य आणखी खुलून गेले होते. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांना अश्रूंचा बांध फुटला आहे. मात्र नियतीच्या मनात काही औरच होते.अचानक चिरंजीवीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्याने पत्नी मेघना राज आणि कुटुबियांना कायमचे अलिवदा म्हटले.

 

टॅग्स :चिरंजीवी