Join us

राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका झाली लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 13:56 IST

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत.

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखाचे आज चंडीगढमध्ये लग्न पार पडणार आहे. मागील शनिवारी या कपलने एंगेजमेंट केली होती. या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आता राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका लीक झाली आहे. हे कार्ड खूप स्पेशल आहे. या कार्डमधून त्या दोघांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाणाच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. ही निमंत्रण पत्रिका एका फॅनपेजद्वारे ट्विटरवर शेअर केले गेले आहे.

अखेर तो क्षण आला आहे, राजकुमार राव आणि पत्रलेखा दोघे लवकरच सात फेरे घेणार आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या कपलच्या निमंत्रण पत्रिकेतून समजते आहे की दोघांचे लग्न चंडीगढमध्ये होत आहे. कार्डचे रंग इंडिगो कलर आहे. निमंत्रण पत्रिका पाहून असे वाटत आहे की हे वधूकडून पाठवण्यात आले आहे. यात लिहिले आहे की, राव कुटुंब आणि पॉल कुटुंब, राजकुमार (सुपुत्र कमलेश यादव आणि सत्यप्रकाश यादव) आणि पत्रलेखा (सुपुत्री अजीत पॉल आणि पैपरी पॉल)च्या लग्नाच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला आमंत्रित करत आहोत. दिनांक १५ नोव्हेंबर, ठिकाण २१ ऑबेरॉय सुखविलास, चंडीगढ. हा व्हिडीओ तुम्ही पाहू शकतो.

मागील शनिवारी राजकुमार राव आणि पत्रलेखाने न्यू चंडीगढमधील ऑबेरॉय सुखविलास स्पा रिसॉर्टमध्ये साखरपुडा केला होता. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ राजकुमार गुडघ्यावर बसून पत्रलेखाला प्रपोझ करताना दिसला. त्यानंतर पत्रलेखादेखील त्याच्या समोर बसली. मग दोघांनी एकमेकांना अंगठी घातली आणि डान्सदेखील केला.

टॅग्स :राजकुमार रावपत्रलेखा