Join us
Daily Top 2Weekly Top 5

Wedding Bells :कबीर सिंगमधील अभिनेत्रीशी जुबिन नौटियाल करणार लग्न?, सीक्रेट वेडिंगची तयारी आहे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 16:47 IST

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक असलेल्या जुबिन नौटियालच्या लग्नाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक असलेल्या जुबिन नौटियालच्या लग्नाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत.  लवकरच तो अभिनेत्री निकिता दाससोबत लग्नगाठ बांधणार आहे, जिने शाहिद कपूरसोबत  'कबीर सिंग' चित्रपटात काम केले होते. ते अनेकवेळा एकत्र स्पॉट झाले आहेत, ज्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांनी आणखी जोर धरला आहे. 

जुबिन नौटियाल आणि निकिता सोशल मीडियावरही एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. ते रोज एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत असतात.अलीकडेच निकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे हा फोटो तिचा नसून या फोटोत जुबिन नौटियाल बसलेला दिसत होता. फोटोत जुबिन नदीकडे तोंड करुन बसलेला दिसत आहे. फोटो शेअर करत निकिताने लिहिले, "मी माझा आत्मा या सुंदर पर्वतांमध्ये सोडून आलं आहे."

जुबिनच्या कुटुंबीयांना भेटली निकिता मीडिया रिपोर्टनुसार, निकिता उत्तराखंडमधील झुबिन नौटियालच्या घरीही गेली होती, जिथे तिने त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली.दोघांचे कुटुंब या नात्यावर खूप खूश आहेत. 

लग्नाच्या तयारीत बिझी दोघे?यावेळी हे कपल लग्नाच्या प्लॉनिंगमध्ये आहेत. हे डेस्टिनेशन वेडिंग असेल, उत्तराखंंडच्या पर्वतरांगामध्ये होईल. यबाबत जुबिन किंवा निकिता यांच्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नसले तरी त्यांचे चाहते ही बातमी ऐकून खूप उत्सुक आहेत.

टॅग्स :कबीर सिंग