Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 11:20 IST

२०१७ साली विराट-अनुष्काने सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. मात्र लग्नानंतर सहा महिन्यातील केवळ २१ दिवसच हे कपल एकत्र होतं. अनुष्कानेच याचा खुलासा केला होता. 

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. विरुष्काचे केवळ देशातच नाहीत तर जगभरात चाहते आहेत. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. २०१७ साली विराट-अनुष्काने सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. मात्र लग्नानंतर सहा महिन्यातील केवळ २१ दिवसच हे कपल एकत्र होतं. अनुष्कानेच याचा खुलासा केला होता. 

"जेव्हा मी विराटला भेटायचे किंवा तो मला भेटायला यायचा तेव्हा लोकांना वाटायचं की आम्ही एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेत आहोत. पण, तसं नसायचं. विराट नेहमीच कामात बिझी असायचा. लग्नानंतरच्या ६ महिन्यांत आम्ही केवळ २१ दिवस एकत्र होतो. म्हणून जेव्हा मी परदेशात त्याला भेटायला जायचे तेव्हा त्याच्यासोबत एक वेळचं तरी जेवण करायचे. आमच्यासाठी हा अमूल्य वेळ होता", असं अनुष्का म्हणाली होती. 

दरम्यान, अनुष्का-विराटच्या लग्नाला ८ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांनी इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. त्यांच्या लग्नाची प्रचंड चर्चा रंगली होती. लग्नानंतर ४ वर्षांनी अनुष्काने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. २०२१ मध्ये त्यांना वामिका ही मुलगी झाली. तर गेल्या वर्षी विरुष्काला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्यांनी आपल्या लेकाचं नाव अकाय असं ठेवलं आहे.  

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा