Watch VIP-2 Trailer : धनुष उत्साही एम्प्लॉय, तर काजोल डॅशिंग बॉस !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2017 22:18 IST
अभिनेत्री काजोल आणि तामिळ अभिनेता धनुष यांच्या आगामी ‘व्हीआयपी-२’ या चित्रपटाचे दुसरे ट्रेलर आज रिलीज करण्यात आले आहे.
Watch VIP-2 Trailer : धनुष उत्साही एम्प्लॉय, तर काजोल डॅशिंग बॉस !
अभिनेत्री काजोल आणि तामिळ अभिनेता धनुष यांच्या आगामी ‘व्हीआयपी-२’ या चित्रपटाचे दुसरे ट्रेलर आज रिलीज करण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये ही गोष्ट स्पष्ट झाली की, चित्रपटात धनुष एम्प्लॉय असून, काजोल त्याची बॉस आहे. जेवढा दमदार अभिनय धनुषचा दिसत आहे, तेवढ्याच डॅशिंग अंदाजात काजोलही दिसत आहे. त्यामुळे हा चित्रपट साउथमध्ये दमदार मजल मारेल असाच काहीसा अंदाज वर्तविला जात आहे. ‘व्हीआयपी-२’ हा एक तामिळ मसाला चित्रपट आहे. ज्याचा पहिला पार्ट ‘व्हीआयपी’ (वॅलेइल्ला पट्टाधारी) २०१४ मध्ये रिलीज झाला होता. धनुष या चित्रपटात केवळ अभिनयच करीत नाही, तर या चित्रपटाला प्रोड्यूसही करीत आहे. एवढेच नव्हे तर धनुषने या चित्रपटाचे डायलॉग आणि कथाही लिहिली आहे. दरम्यान, चित्रपटाचे दोन ट्रेलर रिलीज झाले असले तरी, अद्यापपर्यंत चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली गेली नाही. त्यामुळे हा चित्रपट केव्हा रिलीज केला जाईल याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री काजोल मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे. वृत्तानुसार काजोलने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. सर्वांनाच असे वाटत आहे की, काजोल पहिल्यांदाच साउथ चित्रपटात काम करीत आहे. मात्र हा तिचा दुसरा चित्रपट असून, तिने १९९७ मध्ये आलेल्या ‘मिन्सारा कानावु’ या तामिळ चित्रपटामध्ये काम केलेले आहे. दरम्यान, या चित्रपटाचा अनुभव शेअर करताना काजोलने धनुष आणि दिग्दर्शक सौंदर्या यांच्याविषयी म्हटले की, हे दोघेही खूप चांगले व्यक्ती आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच मजेशीर राहिला आहे.