Watch Video : जेव्हा शाहरूख खान आपल्या लाडक्या अबरामबरोबर रेस लावतो तेव्हा...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2017 21:53 IST
गेल्या शनिवारी झालेल्या आयपीएल सामन्यात प्रेक्षकांना सामन्याचा आनंद लुटता आलाच; शिवाय सामन्यानंतर अभिनेता शाहरूख खान अन् त्याचा लाडका अबराम यांच्यात रंगलेल्या रेसची मजाही लुटता आली.
Watch Video : जेव्हा शाहरूख खान आपल्या लाडक्या अबरामबरोबर रेस लावतो तेव्हा...!
गेल्या शनिवारी झालेल्या आयपीएल सामन्यात प्रेक्षकांना सामन्याचा आनंद लुटता आलाच; शिवाय सामन्यानंतर अभिनेता शाहरूख खान अन् त्याचा लाडका अबराम यांच्यात रंगलेल्या रेसची मजाही लुटता आली. ईडन गार्डनवर शाहरूखने आपल्या लाडक्यासोबत रेस लावली होती. हे दृश्य बघून प्रेक्षक दंग राहिले. अबरामसोबत धावताना शाहरूख अगदीच लहान मुलगा झाला होता. याबाबतचा एक व्हिडिओही यावेळी शेअर करण्यात आला. जेव्हा शाहरूख अबरामबरोबर ईडन गार्डनवर उतरला तेव्हा उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. प्रेक्षकांचा उत्साह बघून शाहरूखनेदेखील आपल्या चिमुकल्याबरोबर मैदानावर धाव घेतली. हे बघून प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव त्याने पुन्हा एकदा आपल्या लाडक्यासोबत रेस लावली. ‘आयपीएल’च्या या सीजनमध्ये पहिल्यांदाच शाहरूखने होम ग्राउंडवर कोलकाता नाइट रायडर्सचा सामना बघितला. सामना संपला तरीही प्रेक्षक मोठ्या प्रमाणात मैदानात उपस्थित होते. यातील बºयाचशा प्रेक्षकांना शाहरूखची एक झलक बघायची होती. प्रेक्षक काहीही करता मैदानाबाहेर जाण्यास तयार नव्हते. जेव्हा ही बाब शाहरूखच्या लक्षात आली तेव्हा त्याने अबरामबरोबर मैदानात एंट्री करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या सामन्यात शाहरूखच्या टीमला मुंबई इंडियन्सकडून हार पत्कारावी लागली. जेव्हा शाहरूख आणि नीता अंबानी सामन्याच्या अखेरीस आयोजित केल्या गेलेल्या सोहळ्यासाठी गेले तेव्हा त्याने अबरामला काही वेळ मैदानात पळण्यास सांगितले. अबराम एकटाच मैदानात पळण्याचा आनंद घेत होता. काही वेळानंतर शाहरूखही त्याच्या या रेसमध्ये सहभागी झाला. मग काय या पिता-पुत्रामधील व्हर्चुअल रेसचा सामना बघावयास मिळाला. यावेळी मुंबई इंडियन्सचा खेळाडू हार्दिक पांड्या याने शाहरूखला हस्तांदोलन करीत त्याच्यासोबत फोटो काढले. अनेक प्रेक्षकांनी शाहरूख अन् अबरामच्या अदाही कॅमेºयात कैद केल्या.