Join us

Watch Video: तनुश्री दत्ताच्या दणक्याने बिथरली राखी सावंत, अशी दिली प्रतिक्रिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 22:20 IST

तनुश्री दत्ता -नाना पाटेकर वादात ड्रामा क्विन राखी सावंतने उडी घेतल्यानंतर काय होणार, याची कल्पना तुम्ही-आम्ही करू शकतो. होय, राखी ...

तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादात ड्रामा क्विन राखी सावंतने उडी घेतल्यानंतर काय होणार, याची कल्पना तुम्ही-आम्ही करू शकतो. होय, राखी सावंत बरळली आणि तनुश्रीने तिच्याविरोधात १० कोटी रूपयांचा अबु्रनुकसानीचा दावा ठोकला. ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर ‘त्या’ दिवशी तनुश्री आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्जच्या नशेत बेशुद्ध होऊन पडली होती, असा दावा राखी सावंतने अलीकडे केला होता. या दाव्यानंतर तनुश्रीने जोरदार प्रतित्त्युर देत, राखी विरोधात १० कोटींचा अबु्रनुकसानीचा दावा ठोकला. तनुश्रीच्या या दणक्यानंतर राखी बिथरली नसेल तर नवल़ अबु्रनुकसानीच्या दाव्यानंतर राखीने पुन्हा एकदा तनुश्रीला लक्ष्य केले आहे. तनुश्रीवर आगपाखड करणारे अनेक व्हिडिओ तिने तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. नाना पाटेकर आणि राज ठाकरे यांच्याकडून तनुश्रीला काहीही लाटता आले नाही. आता ती माझ्या मागे पडली आहे. माझ्यावर आरोप करून ती लोकप्रीयता लाटू पाहत आहे, असे राखीने म्हटले आहे.

काय म्हणाली होती राखी‘त्या दिवशी मी घरी बसले असताना मला मास्टरजीचा(गणेश आचार्य) फोन आला. राखी, लवकर सेटवर ये. तुला गाणे करायचे आहे, असे ते मला म्हणाले. मी त्यांना गाणे पाठवण्याची विनंती केली. यावर तू फक्त ये. मी गाणे करतोय ना, मग तुला काय करायचे, असे ते मला म्हणाले. त्यांच्या फोननंतर मला नाना पाटेकर यांचाही फोन आला. त्यांनीही मला सेटवर लवकर पोहोचण्यास सांगितले. यानंतर मी घाईघाईत सेटवर पोहोचले. पण सेटवरचे चित्र पाहून मला धक्काचं बसला. काय झाले, हे कळायला मार्ग नव्हता. तिथे मेकअप व्हॅन होती. खूप सारे लोक होते़ मीडिया होता़ तोडफोडही झालेली दिसत होती. मी गणेश आचार्य यांना विचारले तर हे गाणे तनुश्रीचे होते. आम्ही थोडे शूट केलेही. पण आता ती कोआॅपरेट करत नाहीये, असे त्यांनी मला सांगितले. यानंतर मी कॉल करून बघते, असे म्हणून तनुश्रीला कॉल केला. पण तिने माझा कॉनही उचलला नाही़. त्यावेळी डेजी शाह गणेश आचार्य यांची अस्टिस्टंट होती. तिनेचं मला सगळे काही सांगितले. डेजी स्वत: १० वेळा तनुश्रीला बोलवायला गेली होती. पण तिने आपल्या व्हॅनिटी व्हॅनचा दरवाजा उघडला नाही. यानंतर तनुश्रीच्या मेकअप आर्टिस्टने मला सांगितले की, तनुश्री ३-४ तासांपासून बेशुद्ध आहे. मी का? असे त्याला विचारले असता ती ड्रग्ज घेऊन बेशुद्ध पडली असल्याचे त्याने मला सांगितले, ह्णअसे राखीने सांगितले होते.

टॅग्स :तनुश्री दत्ताराखी सावंत