Join us

watch video:​ संजय दत्तला मागावी लागली भररस्त्यात माफी! जाणून घ्या प्रकरण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 13:49 IST

अभिनेता संजय दत्त याचा ‘भूमी’ चित्रपट सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. याचे कारण आहे, ‘भूमी’च्या सेटवरचे मारहाण प्रकरण. होय, गुरुवारी ‘भूमी’च्या सेटवर संजयचे बॉडीगार्ड्स आणि मीडियात जोरदार जुंपली. यादरम्यान संजयच्या बॉडीगार्ड्सनी मीडियाच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की करत, त्यांचे कॅमेरे व अन्य सामान हिसकावून घेतले.

अभिनेता संजय दत्त याचा ‘भूमी’ चित्रपट सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. याचे कारण आहे, ‘भूमी’च्या सेटवरचे मारहाण प्रकरण. होय, गुरुवारी ‘भूमी’च्या सेटवर संजयचे बॉडीगार्ड्स आणि मीडियात जोरदार जुंपली. यादरम्यान संजयच्या बॉडीगार्ड्सनी मीडियाच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की करत, त्यांचे कॅमेरे व अन्य सामान हिसकावून घेतले. याचा तीव्र निषेध करत मीडियाने थेट पोलिसांत धाव घेतली. प्राप्त माहितीनुसार, याप्रकरणी चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार आणि अभिनेता संजय दत्त याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्थात या संपूर्ण घटनेनंतर संजय दत्तने मीडियाची माफी मागितली आहे.आग्रा येथे ताजमहल परिसरात या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. ताजमहालपासून काही दूर अंतरावरच्या व्हीव्हीआयपी रोडवर शूटींग सुरु असल्याने या मार्गावर जाम लागला होता. ताजमहालच्या दर्शनासाठी येणाºया देश-विदेशातील पर्यटकांना यामुळे त्रास सहन करावा लागत होता. याच्याच वृत्तांकनासाठी काही पत्रकार याठिकाणी गेले होते.याचदरम्यान फोटो काढण्यावरून मीडिया व संजयच्या सुरक्षारक्षकांमध्ये वाद झाला. सुरक्षारक्षकांनी मीडिया प्रतिनिधींना मारहाण करीत, त्यांच्याजवळचे साहित्य हिसकावून घेतले.  यात अजय कुमार नामक पत्रकारासह पाच पत्रकार जखमी झालेत. पीडित पत्रकार अजय कुमार यांनी सांगितले की, मी केवळ कव्हरेजसाठी गेलो होतो. मात्र संजय दत्तच्या सुरक्षारक्षकांनी मला मारहाण केली. मला काठीने झोडपले. या मारहाणीत माझ्या डोक्याला आणि छातीला दुखापत झाली.हा वाद इतका विकोपाला गेला की, अखेर संजयला पुढे यावे लागले. सुरक्षारक्षकांच्या गैरवर्तनासाठी संजयने सगळ्यांदेखत मीडिया प्रतिनिधींची माफी मागितली.गेल्या पंधरा दिवसांपासून ताजमहाल परिसरात ‘भूमी’चे शूटींग सुरु आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि अदिती राव मुख्य भूमिकेत आहेत.