Join us

Watch Video : रणवीर सिंगने बर्फाच्छादित क्रिकेटच्या मैदानावर मारला षटकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2017 21:56 IST

अभिनेता रणवीर सिंग हा कधी ड्रेसमुळे तर कधी सिनेमांमुळे चर्चेत असतो. सध्या तो बहुचर्चित संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ ...

अभिनेता रणवीर सिंग हा कधी ड्रेसमुळे तर कधी सिनेमांमुळे चर्चेत असतो. सध्या तो बहुचर्चित संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, सध्या संपूर्ण टीमसोबत तो स्वित्जर्लंड येथे शूटिंगसाठी पोहचला आहे. मात्र त्याने शूटिंगपूर्वीच बर्फाच्या मैदानात क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याबाबतचा त्याने एक व्हिडिओही त्याने ट्विटरवर शेअर केला असून, ‘पद्मावती’च्या या अलाउद्दीनचा अंदाज फॅन्सकडून चांगलाच पसंत केला जात आहे. व्हिडिओमध्ये रणवीर नेहमीच्याच मजेशीर अंदाजात दिसत आहे. कारण टॉस उडविल्यानंतर रणवीर अम्पायरकडे मॅच जिंकल्यानंतर काय मिळणार? असे विचारताना दिसतो. रणवीरच्या या प्रश्नावर अम्पायरदेखील त्याला दुप्पट लगान मिळणार असल्याचे सांगतो. मग, काय रणवीर लगेचच सामन्याला सुरुवात करतो. स्वत:च कॉमेन्ट्री करीत तो बर्फामध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात करतो. विशेष म्हणजे यावेळी स्क्रिनवर त्याचा क्रिकेट रेकॉर्डही बघावयास मिळते. व्हिडिओच्या अखेरीस तो एका चेंडूवर जोरदार फटका मारतो अन् बॅट उंचावून संगळ्यांना अभिवादन करताना दिसतो. }}}} रणवीरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धूम उडवित असून, नेटिझन्सकडून त्यास जबरदस्त लाइक्स मिळत आहे. आतापर्यंत त्याच्या या व्हिडिओला चार हजारांपेक्षा अधिक नेटिझन्सनी पाहिला असून, ९०० यूजर्सनी त्यास रिट्विट केले आहे. रणवीर आणि दीपिका पादुकोण हे दोघेही संजय लीला भन्साळी यांच्या तिसºया सिनेमात काम करत आहेत. याआधी त्यांनी ‘रामलीला’, ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटांमध्ये काम केले होते. या बॉलिवूडच्या जोडीसोबत शाहिद कपूर या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करत आहे.