Join us
Daily Top 2Weekly Top 5

watch Video : ​तुमच्या घरीही डिलिवरी बॉईज बनून येऊ शकतात ‘फुकरे’! राहा, सज्ज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 11:51 IST

‘फुकरे रिटर्न्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. प्रमोशनही असे की,‘फुकरे रिटर्न्स’च्या टीमने सगळ्यांना मागे टाकले आहे.

‘फुकरे रिटर्न्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. प्रमोशनही असे की,‘फुकरे रिटर्न्स’च्या टीमने सगळ्यांना मागे टाकले आहे. ‘फुकरे रिटर्न्स’च्या टीमने प्रमोशनसाठी एक भन्नाट फंडा वापरला आहे. सध्या ‘फुकरे रिटर्न्स’चे कलाकार म्हणजेच पुलकित सम्राट, वरूण शर्मा, मनजोत सिंह,अली फजल असे सगळे डिलीवरी बॉय बनून घरोघरी पार्सल देत फिरत आहेत. होय, ‘फुकरे रिटर्न्स’चे कलाकार अमेजॉनसाठी डिलीवरी करताहेत. खुद्द बॉलिवूड कलाकार आपली डिलीवरी घेऊन येत आहेत, म्हटल्यावर ग्राहकांचे काय होणार, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. ग्राहक आनंदाने बेभान होत आहेत.‘फुकरे रिटर्न्स’चे बॉईज भोली पंजाबनपासून स्वत:ला वाचवण्यासाठी तिची प्रत्येक अट मानायला तयार होतात आणि मग भोली पंजाबन (रिचा चड्ढा) त्यांना डिलीवरी बॉयचे काम करण्याचा आदेश देते, असा हा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवा. या मजेशीर व्हिडिओत ‘फुकरे रिटर्न्स’चे कलाकार   डिलीवरी बॉय बनून घरोघरी आपल्या चित्रपटाचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या काळात हे डिलिवरी बॉईज तुमच्याही दारावरची बेल वाजवू शकतात.२०१३ साली  ‘फुकरे’ हा सिनेमा आला होता. विनोदाचा तडका असलेला हा फुल टू कॉमेडी चित्रपट प्रचंड गाजला होता. ‘फुकरे’ बॉक्सआॅफिसवर हिट ठरला होता. एकही मोठा स्टार नसताना या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर ५० कोटींची कमाई केली होती.  पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे शॉर्टकट्स मारणा-या चार मित्रांची कथा यात दिसली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल अर्थात ‘फुकरे रिटर्न्स’ येतोयं आणि हा सीक्वलही प्रेक्षकांचे धम्माल मनोरंजन करणार असे दिसतेयं.  काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला. या ट्रेलरने  लोकांना पोट धरून धरून हसवले. ALSO READ : पुन्हा परतली ‘फुकरे’ गँग...पाहा, ‘फुकरे रिटर्न्स’चा ट्रेलर!!‘फुकरे रिटर्न्स’मध्ये पुलकित सम्राट, वरूण शर्मा, मनजोत सिंह, रिचा चड्ढा, अली फजल ही आधीचीच कास्ट दिसणार आहे.   येत्या ८ डिसेंबरला रिलीज होणा-या या चित्रपटाची टॅगलाईन आधीच्या चित्रपटासारखीच आहे. ‘दुनिया उम्मीद पर नहीं, जुगाड़ पर कायम है’ अशी ही टॅगलाईन आहे.