Join us
Daily Top 2Weekly Top 5

watch video : अन् ‘त्या’ त्यादिवशी शाहरूख खान अभिनय सोडून देईल...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 14:03 IST

शाहरूख आज बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणवला जातो. पण या सुपरस्टारच्या आयुष्यातही एक ‘हिचकी’ आहेच. होय, राणी मुखर्जीसोबत बोलताना शाहरूखने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी ‘हिचकी’ कोणती, याचा खुलासा केला.

अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन दिल्लीतून मुंबईत आलेल्या शाहरूख खानसाठी बॉलिवूडचा प्रवास सोपा नव्हताच. पण स्वप्नांचा अथक पाठपुरावा, यासाठी उपसलेले प्रचंड कष्ट आणि कामावरची निष्ठा या जोरावर हाच शाहरूख एकदिवस बॉलिवूडचा ‘बादशहा’ बनला आणि पुढे ‘किंगखान’ म्हणून ओळखला जाऊ लागला. शाहरूख आज बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणवला जातो. पण या सुपरस्टारच्या आयुष्यातही एक ‘हिचकी’ आहेच. होय, राणी मुखर्जीसोबत बोलताना शाहरूखने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी ‘हिचकी’ कोणती, याचा खुलासा केला.  राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या पार्श्वभूमीवर राणीने शाहरूखची एक छोटीशी मुलाखत घेतली. याचा व्हिडिओ यशराज फिल्म्सने जारी केला आहे. यात शाहरूखने आपल्या खासगी आयुष्याबद्दल सांगितले आहे. ‘ मी केवळ १५ वर्षांचा होतो, तेव्हा माझे वडिल या जगातून गेलेत. २४ व्या वर्षी माझी आईही मला सोडून गेली. आई-वडिलांच्या निधनाने मी आतून तुटून गेलो होतो. एकदिवस मी त्यांच्या ‘मजार’वर गेलो आणि तिथेच अ‍ॅक्टिंग करण्याचा निर्णय घेतला. मी नशीबवान होतो की, त्याच काळात मला आॅफरही मिळाल्या. अभिनय माझा व्यवसाय नाही. तर माझ्या आई-वडिलांशी जुळलेल्या भाव-भावना व्यक्त करण्याचे, त्यांच्या जाण्याने आयुष्यात आलेले रितेभर भरून काढण्याचे माध्यम आहे. आई-वडिलांच्या जाण्याचे दु:ख, त्या वेदनेचा मनातून निचरा होईल, त्यादिवशी मी अभिनय सोडून देईल. कारण त्यादिवशी माझ्याकडे देण्यासारखे काहीही नसेल. तो दिवस येईल, तेथून परतणे शक्य नसेल. परमेश्वर एखादी ‘हिचकी’ (आयुष्यातील एखादी वेदना वा कमतरता या अर्थाने) देतो तशीच ती दूर करण्याचे माध्यमही देतो. कुठल्याही ‘हिचकी’ने आयुष्य थांबायला नको,’ असे शाहरूखने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. शाहरूख व राणीचा हा व्हिडिओ बघण्यासारखा आहे. तुम्हीही बघा आणि कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा.ALSO READ : राणी मुखर्जी स्टारर ‘हिचकी’चे नवे गाणे ‘फिर क्या गम है’ तुम्ही पाहिले?