Join us

Watch Trailer : ​तुम्हीही पाहा,नसीर-अर्शद जोडीचा ‘इरादा’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 16:48 IST

‘इरादा’ या चित्रपटात अभिनेता अर्शद वारसी आणि नसीरूद्दीन शहा या दोघांची अभिनयाची जुगलबंदी रंगणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च झाला.

‘इश्किया’ आणि ‘डेढ इश्किया’ या सुपरहिट चित्रपटांमधील एक लोकप्रीय जोडी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहे. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेता अर्शद वारसी आणि नसीरूद्दीन शहा यांच्याबद्दल. ‘इरादा’ या चित्रपटात या दोघांची अभिनयाची जुगलबंदी रंगणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च झाला.अपर्णा सिंह दिग्दर्शित या चित्रपटात अर्शद एका पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत आहे. तर नसीरूद्दीन शहा लेफ्टनंट कर्नल प्रभजीत वालियाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. एका रहस्यमयी बॉम्बस्फोटाचा तपास करताना तो यात दिसणार आहे. खरे तर ‘इरादा’ हा चित्रपट एका गंभीर मुद्यावर आधारित आहे. पण या थ्रीलर ड्रामामध्ये कॉमेडीही आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर स्वत: तुम्हाला हे पटेल. खरे तर, नसीरूद्दीन आणि अर्शद ही जोडी एकत्र येते तेव्ही हास्याचे फवारे उडतातच.अर्शद व नसीरूद्दीन यांच्याशिवाय दिव्या दत्ता, सागरिका घाटगे आणि शरद केळकर यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.‘इरादा’ हा चित्रपट आधी १० फेब्रुवारीला रिलीज होणार होता. असे झाले असते तर अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी2’सोबत या चित्रपटाची बॉक्सआॅफिस फाईट रंगली असती. पण  ‘इरादा’मेकर्सनी आपला ‘इरादा’ची रिलीज डेट अचानक पुढे ढकलली. आता हा चित्रपट १७ फेब्रुवारीला चित्रपटगृहांत झळकणार आहे. ट्रेलर बघता, हा सुपरसेन्स थ्रीलर ड्रामा प्रेक्षकांना आवडेल, असे वाटतेय. पण प्रेक्षकांची खरी प्रतिक्रिया जाणून घ्यायाला आपल्याला चित्रपट रिलीज होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नसीर आणि अर्शद यांच्या चाहत्यांनी तोपर्यंत  ‘इरादा’चा ट्रेलर पाहायला हरकत नाही. बघा तर मग...!!Related Stories :  ​‘या’ चित्रपटाने निर्माण केले बॉलिवूडमध्ये दोन नवे ‘शत्रू’?‘जॉली एलएलबी २’ आणि ‘जॉली एलएलबी’मध्ये आहेत ‘या’ काही कॉमन गोष्टी...!