Join us

​ पाहा : रणवीरचे मुंबई प्रेम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 20:49 IST

भन्साळींच्या प्रोजेक्टमध्ये रणवीरची वर्णी लागणार की नाही, हे जाणून घ्यायला चाहते सुपर एक्साईटेड आहेत. पण रणवीर मात्र वेगळ्याच कारणाने एक्साईटेड झालाय. त्याला आनंद आहे तो मुंबईत परतल्याचा.

‘बेफिक्रे’चे पॅरिसमधील तीन महिन्यांचे शूटींग शेड्यूल संपवून अखेर रणवीर सिंह आपल्या कर्मभूमीत परतला. अर्थात कर्मभूमीत पाय ठेवल्यापासून रणवीर कमालीचा बिझी आहे. प्रमोशन, अ‍ॅड शूट, संजय लीला भन्साळींसोबतच्या सीक्रेट्स मीटिंग्स(भन्साळींच्या‘पद्मावती’ या महत्त्वाकांक्षी प्रोजक्टमध्ये रणवीरची वर्णी लागेल, अशी बातमी आहे) असे काय काय रणवीर करतोय. भन्साळींच्या प्रोजेक्टमध्ये रणवीरची वर्णी लागणार की नाही, हे जाणून घ्यायला चाहते सुपर एक्साईटेड आहेत. पण रणवीर मात्र वेगळ्याच कारणाने एक्साईटेड झालाय. त्याला आनंद आहे तो मुंबईत परतल्याचा. हा आनंद रणवीरने एक कृष्णधवल फोटो पोस्ट करून साजरा केला. "Gateway to The City Of Dreams...Damn, its good to be back in The Bay...#Mumbai"  असे गोड कॅप्शन असलेला रणवीरने पोस्ट केलेला हा फोटो तुम्हीही बघाच...