पहा : रणबीर-ऐश्वर्याचे इंटिमेट सिन्स् !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 13:01 IST
रणबीर आणि ऐश्वर्या रॉय या जोडीचा पहिलाच चित्रपट ‘ए दिल है मुश्किल’ चा टीझर नुकताच रिलीज झाला.
पहा : रणबीर-ऐश्वर्याचे इंटिमेट सिन्स् !!!
रणबीर आणि ऐश्वर्या रॉय या जोडीचा पहिलाच चित्रपट ‘ए दिल है मुश्किल’ चा टीझर नुकताच रिलीज झाला. या टीझरमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रॉयचे काही इंटिमेट सिन्स दाखविण्यात आले आहेत. सिनेमाच्या शूटिंगनंतर बिग बी अमिताभ बच्चन सुनेने दिलेल्या या दृष्यांमुळे नाराज झाले होते, असेही बोलले जाते. या सिनेमात ऐश्वर्यासह रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, फवाद खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट एकतर्फी प्रेम, मैत्री आणि तुटलेल्या प्रेमाचे कथानक असणार आहे. १ मिनिटं ३४ सेकंदांच्या टीझरमध्ये रणबीर गात असलेले सिनेमातील टायटल साँग दाखवण्यात आले आहे. एक तासात जवळपास ६० हजार जणांनी हा टीझर पाहिला आहे. यावरुनच प्रेक्षकांची सिनेमाविषयीची उत्सुकता दिसत आहे. हा सिनेमा यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर २८ आॅक्टोबर रोजी बॉक्स आॅफिसवर दाखल होतोय.