View Pics : सुट्या एन्जॉय करून अमेरिकेला रवाना झाली देसी गर्ल प्रियंका चोपडा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2017 20:54 IST
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा आपल्या कुटुंबीयांसमवेत सुट्या एन्जॉय करून अमेरिकेला रवाना झाली आहे. काल रात्रीच प्रियंकाला मुंबई विमानतळावर ...
View Pics : सुट्या एन्जॉय करून अमेरिकेला रवाना झाली देसी गर्ल प्रियंका चोपडा!!
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा आपल्या कुटुंबीयांसमवेत सुट्या एन्जॉय करून अमेरिकेला रवाना झाली आहे. काल रात्रीच प्रियंकाला मुंबई विमानतळावर बघण्यात आले. गेल्या १८ जुलै रोजी प्रियंकाचा वाढदिवस होता. यंदाचा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी ती संपूर्ण आठवडा परिवारासमवेत होती. यावेळी कुटुंबीयांसमवेत मालदीव येथे जाऊन तिने सुट्याही एन्जॉय केल्या. विशेष म्हणजे कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करता यावा म्हणून तिने न्यूयॉर्क येथे झालेल्या आयफा सोहळ्यात जाणे टाळले. काल रात्री जेव्हा तिला मुंबई विमानतळावर बघण्यात आले तेव्हा ती निळ्या रंगाच्या आॅफ शोल्डर ड्रेसमध्ये होते. या ड्रेसवर तिने एक पोल्का डॉट्सवाला लांब श्रगही घातला होता. या ड्रेसमध्ये प्रियंका खूपच सुंदर दिसत होती. यावेळी फ्लाइट पकडण्याची घाई असतानाही तिने तिच्या चाहत्यांसोबत सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. यावेळी प्रियंकाचा मूड खूपच रिलॅक्स वाटला. सुट्या एन्जॉय केल्यानंतर ती पुन्हा एकदा कामावर परतण्याच्या मूडमध्ये दिसत होती. दरम्यान, प्रियंका पुन्हा एकदा विदेशात जाऊन तिचे काम पूर्ण करणार आहे. प्रियंकाने क्वांटिकोचा तिसरा सीझनही साइन केल्याने त्याच्या शूटिंगला ती लवकरच सुरुवात करणार आहे. याशिवाय तिच्याकडे हॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट असून, त्याच्याही शूटिंगला ती सुरुवात करणार आहे. ‘ए किड लाइक जॅक’ आणि ‘एजंट इट रोमॅण्टिक’ असे तिच्या आगामी हॉलिवूडपटांची नावे आहेत. दरम्यान, आता पुन्हा प्रियंका भारतात केव्हा परतणार याविषयी कोणालाच काही माहिती नाही. दरम्यान, प्रियंकाने बॉलिवूडमध्येही काही प्रोजेक्ट साइन केले आहेत. त्याच्या शूटिंगविषयी कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नसल्याने ती बॉलिवूडपटात केव्हा झळकणार याविषयी साशंकताच आहे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या ‘जय गंगाजल’ या चित्रपटात प्रियंका झळकली होती. आता तिने पुन्हा बॉलिवूडमध्ये परतावे, अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे.