Join us

Watch Kalank Trailer : प्रतीक्षा संपली! ‘कलंक’चा ट्रेलर आऊट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 15:39 IST

अखेर प्रतीक्षा संपली आणि ‘कलंक’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

ठळक मुद्देयेत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

अखेर प्रतीक्षा संपली आणि ‘कलंक’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. धर्मा प्रॉडक्शनच्या ‘कलंक’चा टीजर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. काही क्षणांपूर्वी धर्मा प्रॉडक्शनने ‘कलंक’चा ट्रेलर रिलीज केला.गत १५ मार्चला आलियाच्या वाढदिवशी मेकर्सनी ‘कलंक’चे पहिले पोस्टर रिलीज केले होते. हे पोस्टर पाहून चाहते क्रेजी झाले होते. यापाठोपाठ ‘कलंक’चे अनेक पोस्टर्स आलेत आणि चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. यानंतर आलेल्या ‘कलंक’च्या टीजरने तर चाहत्यांचा उत्साहचा आणखीच दुणावला. त्यामुळे कधी एकदा या चित्रपटाचा ट्रेलर येतो, असे चाहत्यांना झाले.

अद्याप ‘कलंक’च्या कथेबद्दल फार खुलासा झालेला नाही. पण चर्चा खरी मानाल तर हा चित्रपट हिंदू- मुस्लिम वादावर आधारित आहे. ८० कोटी रुपए खर्चून बनवलेला हा चित्रपट अगदी शूटींग सुरु झाल्यापासून चर्चेत आहे. ४० च्या दशकाची कथा असलेल्या या चित्रपटात वरूण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर असे दमदार कलाकार आहेत. साहजिकचं या चित्रपटाकडून करणला प्रचंड अपेक्षा आहेत. चित्रपटाला भव्यदिव्य बनवण्यात करण कुठलीही कसर सोडलेली नाही. त्यामुळे रिलीजच्या एक महिन्यापूर्वीच या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहे.   जाणकारांच्या मते, हा चित्रपट आलिया व वरूणच्या करिअरमधील हायेस्ट ओपनिंग ग्रॉसर ठरू शकतो. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

टॅग्स :कलंकवरूण धवनआलिया भट