Join us

​ watch !! एका ज्वलंत विषयाला वाहिलेल्या ‘हिंदी मीडियम’ चा ट्रेलर out !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 12:11 IST

‘हिंदी मीडियम’ या चित्रपटाचे ट्रेलर आऊट झालेय. ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्ही चित्रपटाच्या दिग्दर्शकाची आणि इरफानची पाठ थोपटल्याशिवाय राहणार नाही.

चांगल्या शाळेत मुलांचे अ‍ॅडमिशन करणे, हे कुठले शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. चांगल्या शाळेतील मुलांच्या अ‍ॅडमिशनसाठी भलेमोठे डोनेशन द्यावे लागले. खुद्द पालकांना मुलाखत द्यावी लागते. खरे तर विद्यार्थ्यांची क्षमता मोजण्यासाठी पालकांची परीक्षा, हा कनसेप्ट ऐकायला काहीसा विचित्र वाटतो. पण सध्या अनेक शाळांमध्ये हेच सुरु आहे. अर्थात सगळ्यांनी इंग्लिश मीडियममध्येच शिकावे गरजेचे नाही. तसेच एखादे मुल हिंदी मीडियममध्ये शिकलेय आणि त्याला इंग्रजी येत नसेल तर केवळ त्यावरून त्याला जज करणे हेही योग्य नाही. इरफान खानचा आगामी ‘हिंदी मीडियम’ हा सिनेमा याच विषयावर आधारित आहे.ALSO READ : इरफान खान साडीत दिसतो असा! तुम्हीही पाहा!या चित्रपटाचे ट्रेलर आऊट झालेय. चित्रपटाचे ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्ही चित्रपटाच्या दिग्दर्शकाची आणि इरफानची पाठ थोपटल्याशिवाय राहणार नाही. ट्रेलरची सुरूवात अतिशय हलक्या फुलक्या अंदाजात होते. पण पुढे ट्रेलरमध्ये एका ज्वलंत विषयावर भाष्य केले जाते. इरफान आणि सबा कामर एका मुलीचे आई-वडिल आहेत. त्यांना एका बड्या शाळेत आपल्या मुलीचे अ‍ॅडमिशन करायचे असते. पण एका बड्या इंग्लिश मीडियम शाळेत अ‍ॅडमिशनसाठी काय काय दिव्यातून जावे लागते, हेच या ट्रेलरमध्ये दिसते. अर्थात हा तर केवळ ट्रेलर आहे. कारण ‘पिक्चर तो अभी बाकी है’.या चित्रपटात इरफानच्या अपोझिट आहे ती, पाकिस्तानी अभिनेत्री सबा कामर. या चित्रपटाचे दिग्दर्शन साकेत चौधरी याने केले आहे. यापूर्वी साकेतने विद्या बालन व फरहान अख्तर यांच्या भूमिका असलेल्या  ‘शादी के साईड इफेक्ट्स’  या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटात दिल्लीच्या चांदनी चौक येथे राहणाºया एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा दाखविली जाणार आहे.