Join us
Daily Top 2Weekly Top 5

WATCH : ​दीपिका पादुकोणच्या तालावर कॅप्टन कुल महेन्द्र सिंह धोनीचा ‘धन धना धन’ डान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 15:50 IST

दीपिका पादुकोण आणि कॅप्टन कूल महेन्द्र सिंह धोनी यांचा एक डान्स व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. होय, आयपीएलच्या ...

दीपिका पादुकोण आणि कॅप्टन कूल महेन्द्र सिंह धोनी यांचा एक डान्स व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. होय, आयपीएलच्या ‘धन धना धन’ या अँथम साँगवर चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत दीपिका धम्माल डान्स करताना या व्हिडिओत दिसते आहे. महेन्द्र सिंह धोनी, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या हे सर्व खेळाडूही दीपिकाच्या तालावर नाचत असल्याचे यात दिसतेय. पण या व्हिडिओचा संपूर्ण फोकस धोनी आणि दीपिकावर आहे. आता असे का, यामागचा सगळा इतिहास तुम्हाला ठाऊक आहेच. आज महेन्द्र सिंह धोनी त्याच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी असला तरी एकेकाळी त्याचे नाव दीपिकासोबत जोडले गेले होते. यात किती तथ्य ते आम्हाला ठाऊक नाही. पण एकेकाळी या कपलच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरात होत्या. धोनीला डेट करत असतानांच दीपिका युवराज सिंग याच्याही जवळ गेली होती. हे पाहून नंतर धोनीने स्वत:हून दीपिकाशी सगळे संबंध तोडले, असे मानले जाते.