WATCH : ‘ऐ दिल...’चे ‘क्यूटीपाई....’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 09:34 IST
करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आणि करण गोटात आनंद पसरला. चार दिवसानंतर प्रेक्षकांच्या भेटीस येणाºया या चित्रपटाचे सध्या जोरात प्रमोशन सुरु आहे. अशा या आनंदी वातावरणात रणबीर कपूर मेहंदी लावून बेभान होऊन थिरकतो आहे. अर्थात चित्रपटाच्या नव्या गाण्यात. होय,‘ऐ दिल है मुश्किल’चे नवे गाणे ‘क्यूटीपाई...’ आज रिलीज करण्यात आले.
WATCH : ‘ऐ दिल...’चे ‘क्यूटीपाई....’
करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आणि करण गोटात आनंद पसरला. चार दिवसानंतर प्रेक्षकांच्या भेटीस येणाºया या चित्रपटाचे सध्या जोरात प्रमोशन सुरु आहे. अशा या आनंदी वातावरणात रणबीर कपूर मेहंदी लावून बेभान होऊन थिरकतो आहे. अर्थात चित्रपटाच्या नव्या गाण्यात. होय,‘ऐ दिल है मुश्किल’चे नवे गाणे ‘क्यूटीपाई...’ आज रिलीज करण्यात आले. रणबीर व अनुष्का यांच्यावर चित्रीत या गाण्याच्या माध्यमातून रणबीरच्या मौज-मस्ती करतानाच्या अदा त्याच्या चाहत्यांना वेड लावणाºया आहेत. या अदा पाहिल्यानंतर ‘अजय प्रेम की गजब कहानी’ आणि ‘ऐ जवानी है दीवानी’ हे दोन्ही चित्रपट आणि त्यातील रणबीर आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाही. प्रदीप सिंह सरन आणि नकाश अजीज यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलेल्या या गाण्याचे बोल आहेत अमिताभ भट्टाचार्य यांचे. दिवाळीच्या मुहूर्तावर येणाºया ‘ऐ दिल’चे हे गाणे चित्रपटासाठी बूस्टर ठरो, अशीच अपेक्षा आहे.आज सकाळीच अजय देवगणच्या ‘शिवाय’चा दुसरा ट्रेलर रिलीज झाला. तर संध्याकाळी करणने आपल्या चित्रपटाचे हे नवे गाणे आऊट केले. एकंदर काय, तर अजयच्या प्रमोशनल डावपेचाला करणने अगदी जसेच्या तसे उत्तर दिले. उण्यापुºया चार दिवसांनंतर बॉक्सआॅफिसवर ‘शिवाय’ विरूद्ध ‘ऐ दिल...’ असा सामना रंगणार आहे. आता या सामन्यात कोण बाजी मारतं, कोण जास्त गल्ला जमवतो, ते लवकरच आपल्याला दिसणार आहे. तोपर्यंत तरी प्रतीक्षा आलीच... तेव्हा या प्रतीक्षा काळात हे नवे गाणे बघायला हरकत नाही...!!