Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अशी झाली होती श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची पहिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 16:04 IST

श्रीदेवी आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना त्यांचे अचानक निधन झाले. त्यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने ...

श्रीदेवी आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना त्यांचे अचानक निधन झाले. त्यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. श्रीदेवी यांचे लग्न प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते बोनी कपूर यांच्यासोबत झाले होते. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची पहिली भेट कशी झाली होती याबाबत इंडिया टुडे वुमन सम्मिट २०१३ मध्ये बोनी कपूर यांनी सांगितले होते. श्रीदेवी यांचा एक तामिळ चित्रपट पाहून बोनी कपूर श्रीदेवी यांच्यावर फिदा झाले होते. ही घटना १९७० मधील आहे. त्यावेळी त्यांचे मोना कपूर यांच्याशी लग्न देखील झाले नव्हते. बोनी आणि मोना यांचे लग्न १९८३ला झाले. त्यावेळेच्या आठवणीबद्दल बोनी कपूर यांनी सांगितले होते की, श्रीचा चित्रपट पाहिल्यानंतर मी तिला भेटायला चेन्नईला तिच्या घरी गेलो होतो. पण त्यावेळी ती सिंगापूर येथे चित्रीकरण करत असल्याने आमची भेट झाली नाही. त्यानंतर १९७९ मध्ये तिचा सोलवा सावन हा चित्रपट पाहिल्यानंतर तिच्या एका चित्रपटाच्या सेटवर मी तिला भेटायला गेलो. ती माझी आणि श्रीची पहिली भेट होती. ती लोकांशी जास्त बोलणे पसंत करत नसे. मी तिला माझ्या मिस्टर इंडिया या आगामी चित्रपटाविषयी सांगितले. त्यावर माझ्या व्यवहारिक गोष्टी माझी आई पाहाते असे सांगत मला तिने तिच्या आईशी बोलायला सांगितले होते. त्यावर श्रीच्या आईंनी मला मिस्टर इंडियासाठी १० लाख रुपयांची मागणी केली, मी त्यावर ११ लाख देण्याचे कबूल केले. त्यामुळे श्रीची आई माझ्यावर प्रचंड खूश झाली होती. मिस्टर इंडियाच्या चित्रीकरणाच्यावेळी श्रीला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये याची मी काळजी घेत असे. त्यावेळी व्हॅनिटी व्हॅन नसायची. पण मी तिच्यासाठी वेगळी मेकअप रूम दिली होती. चित्रीकरणाच्या काही काळानंतर ती माझ्याशी व्यवस्थित बोलायला लागली. त्यानंतर आमच्यात मैत्री झाली.मिस्टर इंडिया या चित्रपटानंतर श्रीदेवी चांदनी या चित्रपटासाठी स्विझर्लंडमध्ये चित्रीकरण करत होती. या चित्रीकरणाच्या वेळी तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी बोनी देखील तिथे गेले होते. तिथून परतल्यावर श्रीदेवी यांच्याविषयी त्यांच्या मनात काय भावना आहेत हे त्यांनी त्यांची पत्नी मोनाला सांगितले होते. Also Read : रेखा यांनी दिला जान्हवी कपूर आणि खुशीला आधार