Join us

२०० कोटींचा 'वॉर २'! ऋतिक रोशनला मिळालं तगडं मानधन, तर Jr NTR आणि कियाराने घेतले इतके पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 18:20 IST

हृतिक रोशनसोबत 'वॉर २'मध्ये साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीदेखील झळकणार आहेत. 'वॉर २'साठी कलाकारांनी किती मानधन घेतलं याची आकडेवारी समोर आली आहे. 

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या आगामी 'वॉर २' सिनेमाच्या प्रतिक्षेत चाहते आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत. लवकरच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. हृतिक रोशनसोबत 'वॉर २'मध्ये साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीदेखील झळकणार आहेत. 'वॉर २'साठी कलाकारांनी किती मानधन घेतलं याची आकडेवारी समोर आली आहे. 

'वॉर २' हा सिनेमा २०१९ साली प्रदर्शित झालेल्या 'वॉर' या चित्रपटाचा सीक्वल असणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. सिनेमात ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत असून त्याचा एक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. या सिनेमासाठी अभिनेत्याला तगडं मानधन मिळालं आहे. एकूण २०० कोटींचं बजेट असलेल्या 'वॉर २' सिनेमासाठी हृतिकने जवळपास ४८ कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे. 

या सिनेमात हृतिकसोबत ज्युनियर एनटीआरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'वॉर २'मधून ज्युनियर एनटीआर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमात तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे. 'वॉर २'साठी त्याने ३० कोटी रुपये फी आकारली आहे. 'वॉर २'मध्ये कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. या सिनेमासाठी तिने १५ कोटी रुपये मानधन घेतलं आहे. टीव्ही अभिनेता शब्बीर अहलूवालियादेखील 'वॉर २'मध्ये दिसणार आहे. या सिनेमासाठी त्याला ३०-३५ लाख रुपये इतकं मानधन मिळालं आहे.  

टॅग्स :हृतिक रोशनज्युनिअर एनटीआरकियारा अडवाणी