Join us

'भूल चूक माफ'च्या ओटीटी रिलीजवर वामिका गब्बीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, "सध्या देश..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 16:17 IST

सिनेमा उद्या थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र देशातील घडामोडींमुळे आता सिनेमा थेट ओटीटीवर येणार आहे.

राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि वामिका गब्बी (Wamiqa Gabbi) यांचा आगामी 'भूल चूक माफ' सिनेमा उद्या ९ मे रोजी सिनेमागृहात रिलीज होणार होता. मात्र आज  निर्मात्यांनी सिनेमा थइएटरमध्ये रिलीज न होता थेट ओटीटीवर रिलीज केला जाईल अशी घोषणा केली. देशात सध्या सुरु असलेल्या घडामोडींमुळे मेकर्सने हा मोठा निर्णय घेतला. यावर अभिनेत्री वामिका गब्बीची प्रतिक्रिया समोर आली आहे.

'भूल चूक माफ' हा रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे. सिनेमाचा ट्रेलर सर्वांनाच आवडला. राजकुमार रावच्या परफेक्ट कॉमेडी टायमिंगने सर्वांनाच खळखळून हसवलं. तसंच राजकुमार-वामिकाची जोडीही सर्वांच्या पसंतीस पडली. त्यामुळे सिनेमा बघण्याची उत्सुकता निर्माण झाली. मात्र आता सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार असा निर्णय घेण्यात आला आहे. यावर अमर उजालाशी बोलताना वामिका म्हणाली, "सध्या भारत-पाकिस्तान देशात परिस्थिती नाजूक आहे. देश अशा स्थितीत असताना थिएटरमध्ये सिनेमा रिलीज करणं शक्य नव्हतं. आम्ही सगळेच आपल्या देशासाठी उभे आहोत. देशच आपलं प्राधान्य आहे. तसंच सिनेमा  कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे याचा आम्हाला आनंद आहे. ओटीटीवर रिलीज झाला तर सिनेमा आणखी जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल."

ती पुढे म्हणाली, "मी मेकर्सच्या या निर्णयाचं स्वागतच करते. सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणं आमच्या सर्वांसाठी खास होतं  पण सध्याची परिस्थिती पाहता सिनेमा प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचेल यातच आम्हाला समाधान आहे."

'भूल चूक माफ' आता १६ मे रोजी अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. मॅडॉक फिल्म्सने सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमा राजकुमार राव, वामिका गब्बी, संजय मिश्रा यांची भूमिका आहे. करण शर्मा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

टॅग्स :बॉलिवूडराजकुमार राव