Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘दीवार पर दीवार’! मुंबईची एक अख्खी भिंत अमिताभ बच्चन यांच्या नावे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 11:51 IST

महानायक अमिताभ बच्चन यांची नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. हेच औचित्य साधून काही दर्दी चाहत्यांनी अमिताभ यांना त्यांच्या ७५ ...

महानायक अमिताभ बच्चन यांची नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. हेच औचित्य साधून काही दर्दी चाहत्यांनी अमिताभ यांना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाची एक अनमोल भेट दिली आहे. खुद्द अमिताभ यांनीही कल्पना केली नसेल, अशी ही भेट आहे. या चाहत्यांनी मुंबईच्या वांद्रे येथील एका इमारतीची एक अख्खी भिंत अमिताभ यांच्या नावे केली आहे. होय, या चाहत्यांनी इमारतीच्या एका भिंतीवर अमिताभ यांच्याच ‘दीवार’ या चित्रपटातील त्यांचे पेन्टिंग चितारले आहे.२३० फुटांच्या उंच भिंतीवर काढलेले अमिताभ यांचे हे पेन्टिंग सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अमिताभ यांचे ‘डाय हार्ट फॅन’ असलेले अभिषेक कुमार आणि रजीत दहिया या दोघांनी मिळून हे पेन्टिंग काढले आहे. निश्चितपणे अमिताभ यांच्यासाठीही यापेक्षा मोठी भेट कुठली असूच  शकत नाही. खुद्द बिग बी यांनीही या पेन्टिंगचा फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. आता तर या अनमोल आर्टवर्कची रेकॉर्ड बुकमध्ये नोंद होऊ शकते, अशीही खबर आहे.गत ११ आॅक्टोबरला अमिताभ यांचा ७५ वा वाढदिवस साजरा झाला. अमिताभ यांनी मालदिव येथे आपल्या कुटुंबासोबत अतिशय साध्या पद्धतीने या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले होते. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वयार्चे वडिल कृष्णराज राय यांचे याचवर्षी मार्च महिन्यात निधन झाले. प्रथेनुसार, राय कुटुंबाच्या दु:खात सहभागी होत बच्चन कुटुंबाने  यंदा वर्षभर सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचमुळे  अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाची पाटीर्ही बच्चन कुटुंबाने टाळली होती. तूर्तास अमिताभ अनेक चित्रपटांत बिझी आहेत. त्यांचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ते आमिर खानसोबत दिसणार आहेत. याशिवाय ‘102 नॉट आऊट’ या रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटातही अमिताभ दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे अमिताभ व ऋषी कपूर यांची जोडी २६ वर्षांनंतर पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र येणार आहे. अलीकडे ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर अमिताभ यांची प्रकृती बिघडल्याची खबर आली होती. त्यांच्या घशाला संसर्ग झाल्याने त्यांना ‘केबीसी’चे शूट ऐनवेळी रद्द करावे लागले होते.ALSO READ: ​‘केबीसी’च्या सेटवर बिघडली अमिताभ बच्चन यांची तब्येत; ऐनवेळी शूटींग रद्द!