Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडचा सर्वात कंजूस को-स्टार कोण होता? वहिदा रहमान यांनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 12:04 IST

बॉलिवूडच्या सदाबहार अभिनेत्री वहिदा रहमान यांनी अलीकडे ‘सुपरस्टार सिंगर’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. यावेळी वहिदा यांनी आपल्या फिल्मी करिअरमधील अनेक किस्से सांगितले.

ठळक मुद्देराजेश खन्ना यांना बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हटले जाते.

बॉलिवूडच्या सदाबहार अभिनेत्री वहिदा रहमान यांनी अलीकडे ‘सुपरस्टार सिंगर’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. यावेळी वहिदा यांनी आपल्या फिल्मी करिअरमधील अनेक किस्से सांगितले. तुमच्या मते, बॉलिवूडमधील तुमचा सगळ्यात वाईट को-स्टार  कोण होता? असा प्रश्न शोचा होस्ट जय भानुशालीने वहिदा यांना केला. यावर वहिदा यांनी कुणाचे नाव घ्यावे? तर राजेश खन्ना यांचे.

होय, राजेश खन्ना सर्वांत वाईट को-स्टार होता, असे वहिदा म्हणाल्या. लोक त्याला सुपरस्टार मानायचे पण तो सवात कंजूस स्टार होता. पैशाची गोष्ट निघाली की, राजेश खन्ना हळूच तिथून सटकायचा. तो सेटवर सर्वात उशीरा यायचा. अगदी सकाळची शिफ्ट असली की तो दुपारी उगवायचा. त्यांच्यासोबत काम करताना मला कधीच फारसा आनंद वाटला नाही, असेही वहिदा यांनी सांगितले.

राजेश खन्ना यांना बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हटले जाते. अख्खा देश त्यांचा ‘दिवाना’ होता. मुली तर त्यांची एक झलक पाहण्यासाठी अक्षरश: जीवाच्या रान करायच्या. राजेश खन्ना यांचे सुपरस्टारडम फार काळ टिकले नाही. पण जितके दिवस टिकले त्या काळात त्यांची स्टाईल कमालीची लोकप्रिय झाली होती.जय भानुशालीने त्या काळातील अभिनेत्यांची त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांनुसार क्रमवारी सांगण्याची गळ वहिदा यांनी घातली. यावेळी वहिदा यांनी शशी कपूर यांचे नाव घेतले. शशी कपूरजी फार हँडसम आणि रूबाबदार व्यक्तिमत्त्व होते. ते सेटवर प्रचंड मस्ती करायचे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :वहिदा रहमानराजेश खन्ना