Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकेकाळी कलाकारांच्या खोल्या साफ केल्या, सेटवर चहा द्यायचा! बॉलिवूड अभिनेत्याची मेहनत फळाली आली, आज आहे कोट्यवधींचा मालक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:08 IST

फराह खानचा असिस्टंट, सफाईचं केलं काम! आज आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक, कोण आहे तो?

Vivek Oberoi: अभिनेत्यांच्या मुलांनी अभिनेता होणे हे चित्रपटसृष्टीसाठी नवीन नाही. पण केवळ चित्रपटसृष्टीत येणे महत्वाचे नाही तर इथे टिकणे व नाव कमावणेही महत्वाचे आहे. हे काही मोजक्याच अभिनेता पुत्रांच्या नशीबी आले. त्यातील एक म्हणजे अभिनेता विवेक ओबेरॉय वडीलांची अभिनय परंपरा पुढे सुरु ठेवत हिंदी चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारुन त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या विवेक ओबेरॉय त्याच्या मस्ती-४ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. 

अलिकडेच मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये विवेक ओबेरॉयने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं. स्टार किड्स असूनही त्याने करिअरच्या सुरुवातीलाच फराह खानचा असिस्टंट म्हणून काम केलं. त्या आठवणी शेअर करताना अभिनेता म्हणाला, मी फराह खानचा असिस्टंट म्हणून बरीच वर्ष कामं केली.त्यावेळी कलाकारांच्या रिहर्सल रुम साफ करायचो तसंच त्यांना चहा नेऊन द्यायचं अशी कामे करत होतो.पण, मी कधीच कोणाला माझी ओळख सांगितली नाही.

त्यानंतर २००२ मध्ये, राम गोपाल वर्मांचा 'कंपनी' चित्रपट प्रदर्शित झाला आणि विवेक रातोरात सुपरस्टार बनला. त्यानंतरच्या "साथिया", "मस्ती" आणि "ओमकारा" सारख्या चित्रपटांनी त्याला बॉलीवूडच्या टॉप स्टार्समध्ये स्थान मिळवून दिले.मात्र, त्यानंतर अभिनेत्याच्या करिअरला उतरती कळा लागली. एका मुलाखतीत खुद्द विवेकने खुलासा केला होता की इंडस्ट्रीने त्याला बॅन केलं आहे. त्यामुळे अनेक चित्रपटही आपल्या हातून गेल्याचं त्यांने म्हटलं.शिवाय त्याच्या घरच्यांना धमकीचे फोनही यायचे. या काळात अनेक वाईट प्रसंगाला त्याला तोंड द्याव लागलं.

बॉलिवूडने दरवाजे बंद केल्यानंतर अभिनेता खचला नाहीतर त्याने मल्याळम आणि तेलूगु चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला.पण त्याचं खरं नशीब व्यवसायामुळे उजळलं. त्याने बांधकाम व्यवसायात  नशीब अजमावलं, अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आणि शिक्षण क्षेत्रातही पाऊल ठेवलं. विवेक ओबेरॉय आज फक्त  एक यशस्वी अभिनेता नाही तर एक यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळखला जातो. त्याची एकूण संपत्ती ₹१२०० कोटी इतकी आहे. विवेक सध्या मस्ती-४ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :विवेक ऑबेरॉयबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा