Join us
Daily Top 2Weekly Top 5

विवेक ओबेरॉयच्या 'त्या' आरोपानंतर सलमान खानची कशी होती अवस्था? निर्मात्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 10:04 IST

विवेक ओबेरॉयचं करिअर सलमानने उद्धवस्त केलं? सलमानच्या निर्मात्या मित्रानेच केला खुलासा

अभिनेता विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यातील वाद बीटाऊनमध्ये कायमच सर्वात हॉट टॉपिक राहिला आहे. दोघांमध्ये ऐश्वर्या रायला घेऊन काही वाद झाले. नंतर सलमानने विवेकचं करिअरच उद्धवस्त केलं असंही बोललं गेलं. विवेकने काही वर्षांपूर्वी एका अवॉर्ड शोमध्ये स्टेजवरुन सलमानची माफी मागितली होती. तरी सलमानने त्याला प्रतिसाद दिला नव्हता. नंतर विवेक ओबेरॉयने एका मुलाखतीत सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्यावर भाष्य केलं होतं. तसंच त्यांची मैत्री याच कारणामुळे तुटली असंही वक्तव्य केलं होतं. त्यानंतर सलमानची काय रिअॅक्शन होती याचा खुलासा नुकताच एका निर्मात्याने केला आहे.

सलमानचा मित्र आणि निर्माता शैलेंद्र सिंह सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत काही खुलासे केले. ते म्हणाले, "मी सलमानला खूप आधीपासून ओळखतो. तो अभिनेता होण्यापूर्वीपासून माझा मित्र आहे. तेव्हा मी कफ परेडला राहायचो. सलमान तिथे त्याची पहिली गर्लफ्रेंड शाही जाफरीला भेटायला यायचा. तो मनाने खूप चांगला आहे. मस्त माणूस आहे पण ज्यांच्यासोबत तो असतो ते लोक जरा विचित्र आहेत."

या मुलाखतीत शैलेंद्र यांनी २००३ साली विवेक ओबेरॉयच्या प्रेस कॉन्फरन्सबद्दल खुलासा केला. सलमानने धमकावल्याचा आरोप विवेकने केला होता. या घटनेचा उल्लेख करत शैलेंद्र म्हणाले, "विवेकच्या त्या प्रेस कॉन्फरन्सनंतर मी सलमानला भेटलो. तो खूप रागात होता. याआधी सलमान मोकळेपणाने त्याच्या भावना दाखवायचा, राग व्यक्त करायचा. आता त्याने स्वत:वर खूप नियंत्रण मिळवलं आहे. तेव्हा मी सलमानला काहीही रिअॅक्ट करु नकोस असा सल्ला दिला होता. 'आयुष्यात  विचारपूर्वक कृती केली पाहिजे. जे करायचं ते नंतरही केलं जाऊ शकतं. आत्ता शांत बस, एक ड्रिंक घे आणि त्याला जे करायचं ते करु दे' असं मी त्याला सांगितलं होतं. नंतर सलमानने कदाचित विवेकला बॉलिवूडमध्ये काम मिळू नये याचा बंदोबस्त केला होता. हे मी अधिकृतरित्या सांगू शकत नाही पण बाहेरुन तरी असंच दिसतं."

English
हिंदी सारांश
Web Title : Salman's reaction to Vivek Oberoi's allegations revealed by producer.

Web Summary : Producer reveals Salman's anger after Vivek's allegations about Aishwarya. He advised Salman to stay calm. Later, Salman may have blocked Vivek's Bollywood career, which is not officially confirmed.
टॅग्स :सलमान खानविवेक ऑबेरॉयबॉलिवूड