सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील वैर जगापासून लपून राहिलेले नाही. ऐश्वर्या राय हे या वैराचे कारण हेही सगळ्यांनाच ठाऊक आहे. 2003 मध्ये विवेक ओबेरॉयने स्वत: पत्रपरिषद घेत, सलमानबद्दल एक मोठा खुलासा केला होता. ‘मी आणि ऐश्वर्या सोबत आल्यानंतर सलमानकडून मला जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत. सलमानने रात्री नशेत मला ४२ वेळा फोन केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली,’ असा हा खुलासा होता. त्याच्या या खुलाशानंतर फिल्म इंडस्ट्रीने विवेकला काम देणे बंद केले होते. अनेक वर्षे विवेक इंडस्ट्रीतून गायब होता. अर्थात काही वषार्नंतर विवेक पुन्हा फिल्म इंडस्ट्रीत परतला आणि आजही तो काम करतोय. हा सगळा एपिसोड सांगण्याचे कारण म्हणजे, विवेकची ताजी मुलाखत. होय, 17 वर्षांनंतर विवेक पुन्हा एकदा या संपूर्ण एपिसोडवर बोलला.
सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्या भांडणाचे कारण ऐश्वर्या राय होती. 'हम दिल दे चुके सनम' च्या सेटवर सलमानचे ऐश्वयार्सोबत अफेयर सुरु होते. जवळपास दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यावेळी ऐश्वयार्ने सलमानवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यांनतर ऐश आणि विवेक यांच्यातील जवळीक वाढली. पण सलमानला ते सहन झाले नाही. याचमुळे त्याने विवेकला फोन करून शिवीगाळ केली होती. पण आता कदाचित विवेक हे सगळे विसरराय. सलमानच्या मनात काय आहे, हे अर्थातच कुणालाही ठाऊक नाही.