भारतीय लष्कराच्या धाडसी 'ऑपरेशन सिंदूर'वर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारत-पाकिस्तानमधील तणाव आणि लष्करी कारवाईवर आधारित ही कथा असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. 'द काश्मीर फाइल्स' आणि 'द व्हॅक्सीन वॉर' यांसारख्या चित्रपटांतून खळबळ माजवणारे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या या चित्रपटातील मुख्य अभिनेत्याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.
'ऑपरेशन सिंदूर' चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध सुरू होता. दैनिक जागरणनुसार, बॉलिवूडचा 'स्टार-किड' वरुण धवन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसण्याची दाट शक्यता आहे. विवेक आणि भूषण कुमार यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वीच वरुणला या चित्रपटाबाबत विचारणा केली. वरुणनेही या प्रोजेक्टमध्ये मुख्य भूमिका साकारण्याबाबत उत्सुकता दर्शवली आहे. मात्र अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्याला चित्रपटाची संपूर्ण पटकथा वाचायची आहे. त्यामुळे याबाबतची अधिकृत घोषणा होण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. वरुण धवनने यापूर्वी 'बदलापूर', 'भेडिया' आणि 'बॉर्डर २' सारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची क्षमता सिद्ध केली आहे, त्यामुळे एका सैनिकाच्या कणखर भूमिकेत त्याला पाहणे चाहत्यांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर
लेफ्टनंट जनरल के.जे.एस. 'टायनी' ढिल्लों यांच्या 'ऑपरेशन सिंदूर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राइक्स इनसाइड पाकिस्तान' या पुस्तकावर आधारित आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम मधील बैसरन व्हॅली येथे दहशतवाद्यांनी हल्ला करत २६ नागरिकांचा बळी घेतला होता. या हल्ल्यामागे जैश ए मोहम्मद आणि लष्करे तैय्यबा या पाकिस्तान समर्थित संघटनांचा हात असल्याचे सांगितलं जातं. यानंतर ७ मे रोजी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केलेले.
Web Summary : Varun Dhawan may star in Vivek Agnihotri's 'Operation Sindoor,' based on the Indian Army's operation. He's considering the role after reading the script. The film is based on Lt. Gen. K.J.S. Dhillon's book about India's strikes inside Pakistan after a terror attack.
Web Summary : विवेक अग्निहोत्री की 'ऑपरेशन सिंदूर' में वरुण धवन के अभिनय की संभावना है, जो भारतीय सेना के ऑपरेशन पर आधारित है। स्क्रिप्ट पढ़ने के बाद वह भूमिका पर विचार कर रहे हैं। फिल्म लेफ्टिनेंट जनरल के.जे.एस. ढिल्लों की पाकिस्तान के अंदर हमलों पर आधारित किताब पर आधारित है।