आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' बिग स्क्कीनवर धुमाकूळ घालत आहे. 'धुरंधर' सिनेमा गाजल्यानंतर याच्या दुसऱ्या पार्टची सर्वांना उत्सुकता होती. १९ मार्च रोजी 'धुरंधर: द रिव्हेंज' रिलीज झाला. सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता रणवीर सिंहच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. दुसरीकडे दिग्दर्शक आदित्य धरच्या कौशल्याचीच सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने आदित्य धरला सावध केले आहे.
'द काश्मीर फाईल्स' फेम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी 'धुरंधर: द रिव्हेंज' पाहून प्रतिक्रिया दिली. त्यांना सिनेमा प्रचंड आवडला असून आदित्य धरवर त्यांनी स्तुतीसुमनं उधळली. सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी x वर लिहिले, "मी कॅलिफोर्नियातील एका गावात होतो आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' पाहण्यासाठी खास लॉस एंजेलिसला गेलो. शाब्बास! आदित्य धर, तू पुन्हा एकदा अप्रतिम काम केले आहेस. मला खरंच समजत नाहीये की काय बोलू..."
पुढे त्यांनी म्हटले, "मी जे काही बोलेन ते कदाचित त्या कलाकृतीसमोर केवळ गोंगाट वाटेल, जी स्वतःच सर्व काही सांगतेय. त्यापेक्षा मी तुला फोनच करेन. प्रत्येकानेच दमदार काम केलं आहे. पण मला त्या दोघांचं नाव घ्यायचंय ज्यांच्याबद्दल कमी बोललं जात आहे. विकास नवलखाची वर्ल्ड क्लास सिनेमॅटोग्राफी आणि साईनी जोहरीची अपवादात्मक प्रोडक्शन डिझाईन.'
ते पुढे म्हणाले, "सिनेमा जगतात, कॅमेरा आणि प्रोडक्शन डिझाईन एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. विकास आणि साईनी दोघांनी कमाल केली आहे. त्यांनी एक बेंचमार्क सेट केला आहे. दोघांचं खूप खूप अभिनंदन."
आदित्य धरचं कौतुक करताना विवेक अग्निहोत्रींनी एक सल्लाही दिला. ते म्हणाले, "आदित्य, तू खूप बुद्धिमान आहेस आणि तुला तुझा मार्ग नीट माहित आहे. पण तुझ्या आजूबाजूच्या वातावरणाबाबत (Ecosystem) थोडा सावध राहा. हे वातावरण जितके आकर्षक वाटते, तितकेच ते धोकादायकही असू शकते. बाकी धुरंधरच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन, तुम्ही कमाल केली आहे."
Web Summary : Vivek Agnihotri lauded Aditya Dhar's 'Dhurandhar: The Revenge,' praising its direction and cinematography. He cautioned Dhar about the film industry's environment, advising vigilance despite its allure. Agnihotri commended the entire team for their outstanding work.
Web Summary : विवेक अग्निहोत्री ने आदित्य धर की 'धुरंधर: द रिवेंज' की प्रशंसा की, निर्देशन और सिनेमैटोग्राफी की सराहना की। उन्होंने धर को फिल्म उद्योग के माहौल के बारे में सतर्क किया, इसके आकर्षण के बावजूद सतर्क रहने की सलाह दी। अग्निहोत्री ने पूरी टीम को उनके उत्कृष्ट कार्य के लिए बधाई दी।