रणबीर कपूरची गौरी खानच्या स्टोअरला व्हिजिट; तिच्यासोबत स्पेंड केला क्वालिटी टाइम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 14:12 IST
रणबीर कपूर हा बॉलिवूडमध्ये सध्या दोन गॉसिप्समुळे चर्चेत आहे. एकतर तो त्याची आगामी संजय दत्तच्या आयुष्यावरील बायोपिक आणि दुसरे ...
रणबीर कपूरची गौरी खानच्या स्टोअरला व्हिजिट; तिच्यासोबत स्पेंड केला क्वालिटी टाइम!
रणबीर कपूर हा बॉलिवूडमध्ये सध्या दोन गॉसिप्समुळे चर्चेत आहे. एकतर तो त्याची आगामी संजय दत्तच्या आयुष्यावरील बायोपिक आणि दुसरे म्हणजे त्याचे माहिरा खानसोबत व्हायरल झालेले फोटो. या त्याच्या फोटोंमध्ये तो आणि माहिरा हे सिगारेट ओढताना दिसत आहेत. या फोटोंवर माहिरा खानवरही पाकिस्तानातून खूप टीका करण्यात आली. सोशल मीडियावरही रणबीरची खूप टीका करण्यात आली. आता या सर्व गोष्टींचा परिणाम त्याच्या आगामी चित्रपटावर होऊ नये एवढेच वाटते.बरं, आता रणबीर कपूरच्या बाबतीत आणखी एक बातमी अशी आहे की, तो नुकताच शाहरूख खानची पत्नी गौरी खान हिच्या स्टोअरला भेट देण्यासाठी गेला होता. तिथे त्याने गौरी खानसोबत क्वालिटी टाइम घालवला. तिने तिचा रणबीरसोबतचा हा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. या फोटोत ती खूपच गॉर्जिअस दिसत होती. पांढऱ्या रंगाचा टॉप आणि मोकळे सोडलेले केस अशा लूकमध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. त्याचबरोबर रणबीरही खूपच डॅशिंग अवतारात दिसत होता. या फोटोला तिने कॅप्शन दिले आहे की,‘किपिंग द लूक क्लिन अॅण्ड फ्रेश विथ रणबीर...नो फिल्टर्स नीडेड आॅन द टेरेस! गौरी खान डिझाइन्स’रणबीर कपूर सध्या हिट चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे. कारण त्याचा अलीकडेच रिलीज झालेला ‘जग्गा जासूस’ ही बॉक्स आॅफिसवर दणकून आपटला. हा चित्रपट कॅटरिना कैफ आणि त्याच्या ब्रेकअपमुळे चांगलाच चर्चेत आला होता. आता अलीकडेच तो विमानतळावर दिसला होता. तेव्हा त्याच्या एका बोटात अंगठी घातलेली दिसली. ती म्हणे त्याला एका ज्योतिषाने दिली आहे. आता त्याचे चित्रपट हिट होतील, अशी अपेक्षा आहे.