वरूण-आलियाचे सेटवरील फोटो व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 12:03 IST
आलिया भट्ट आणि वरूण धवन यांनी करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ द इयर’ चित्रपटातून डेब्यू केला होता. नंतर त्यांनी ‘हम्प्टी ...
वरूण-आलियाचे सेटवरील फोटो व्हायरल!
आलिया भट्ट आणि वरूण धवन यांनी करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ द इयर’ चित्रपटातून डेब्यू केला होता. नंतर त्यांनी ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटातून त्यांची कॅ्रकलिंग केमिस्ट्री दाखवून दिली.आता ते पुन्हा एकदा ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांना भेटायला येत आहेत. नुकतेच त्यांचे चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो व्हायरल झाले आहेत. तिसऱ्यांदा वरूण आलियासोबत काम करतोय.चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे तो शूटींग सध्या करतोय. चाहत्यांसोबतचे काही स्टिल्स इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. ‘ड्रीम टीम टूर’ नंतर ते ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ साठी जीव ओतून काम करतांना दिसत आहेत.