Join us
Daily Top 2Weekly Top 5

बारावी उत्तीर्ण विराट कोहलीला मिळाली उच्चशिक्षित पत्नी, जाणून घ्या अनुष्का शर्माचे शिक्षण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 16:38 IST

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे दुसरे ग्रॅण्ड रिसेप्शन आज पार पडणार ...

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे दुसरे ग्रॅण्ड रिसेप्शन आज पार पडणार आहे. गेल्या २१ डिसेंबर रोजी दिल्लीत झालेल्या शाही रिसेप्शन सोहळ्यानंतर क्रिकेटविश्व आणि बॉलिवूडकरांसाठी मंगळवारी मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये दुसरे ग्रॅण्ड रिसेप्शन आयोजित केले आहे. दरम्यान, लग्न झाल्यापासून हे जोडपे सध्या प्रचंड लाइमलाइटमध्ये असून, त्यांच्या जीवनाशी निगडीत बºयाचशा गोष्टी समोर येत आहेत. आज आम्ही या जोडप्याशी निगडीत अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहोत. कारण सध्या बारावी उत्तीर्ण विराटला उच्चशिक्षित पत्नी मिळाल्याची चर्चा रंगत असून, अनुष्काचे नेमके शिक्षण किती? याचाच उलगडा करणार आाहोत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली बारावी उत्तीर्ण असून, त्याने विशाल भारती पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतले. १९९८ मध्ये विराट कोहलीने वेस्ट दिल्ली क्रिकेट अकॅडमी ज्वाईन केले. पुढे त्याने त्याचे संपूर्ण लक्ष क्रिकेटवरच केंद्रित केले. विराटच्या गणित आणि विज्ञानाच्या शिक्षिका आजही त्याला ब्राइट आणि अलर्ट विद्यार्थी समजतात, तर त्याची पत्नी अनुष्का ही त्याच्या तुलनेत जास्त शिकलेली आहे. टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का कला शाखेत पदवीचे, तर अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, मी शाळा आणि महाविद्यालयात टॉपर असायची. मी अगोदरच ठरविले होते की, मला मॉडेलिंगच करायचे आहे. मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याची गाठ बांधल्यामुळे मी अगोदरच ठरविले होते की, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मॉडेलिंग या फिल्डवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहे. लोक माझ्या आई-वडिलांना म्हणायचे की, तुमची मुलगी तर मॉडेलिंग करायला लागली. तेव्हा माझे आई-वडील सांगायचे, ती मॉडेलिंगबरोबरच शाळेतही टॉपर आहे.