Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीची वहिनी अनुष्का शर्माइतकीच आहे सुंदर, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 20:00 IST

विराट आणि अनुष्काच्या रिसेप्शनला अनुष्का इतकेच एक व्यक्ती लक्ष वेधून घेत होती.

ठळक मुद्देविराट कोहलीला एक मोठा भाऊ असून त्याचे नाव विकास कोहली आहे. त्याचे लग्न चेतना कोहलीसोबत झाले असून ती दिसायला अतिशय सुंदर आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ही प्रेक्षकांची लाडकी जोडी असून ते दोघे एकत्र खूपच छान दिसत असल्याचे नेहमीच त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे असते. अनुष्का आणि विराटदेखील सोशल मीडियावर त्यांचे दोघांचे फोटो नेहमीच पोस्ट करत असून या फोटोंना त्यांच्या चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो. विराट आणि अनुष्का हे दोघे वेगवेगळ्या क्षेत्रात असले तरी ते एकमेकांना खूपच चांगल्याप्रकारे समजून घेतात. त्यांच्यात असलेले ट्युनिंग आपल्यालाला नेहमीच पाहायला मिळते. 

विराट कोहलीने क्रिकेटच्या जगतात आपले नाम कमावले आहे. सध्या भारतीय संघ वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असून या संघाचे नेतृत्व विराट कोहली करत आहे तर अनुष्का शर्मा ही आजची आघाडीची अभिनेत्री असून तिने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. अनुष्काने रब ने बना दी जोडी, बदमाश कंपनी, जब तक है जान, पीके यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच तिने परी आणि फिल्लोरी या चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. 

विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे लग्न ११ डिसेंबर, २०१७ ला इटलीत झाले. त्यांनी कोणालाही न सांगता अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत गुपचूप लग्न केले होते. लग्नानंतर काही दिवसांनी त्यांनी मुंबईत त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन दिले होते. लग्नात आणि रिसेप्शनमध्ये अनुष्का खूपच छान दिसत होती. पण या रिसेप्शनला अनुष्का इतकेच एक व्यक्ती लक्ष वेधून घेत होती. या रिसेप्शनमध्ये विराटच्या वहिनीला पाहाता तिच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा मीडियात रंगली होती. 

विराट कोहलीला एक मोठा भाऊ असून त्याचे नाव विकास कोहली आहे. त्याचे लग्न चेतना कोहलीसोबत झाले असून ती दिसायला अतिशय सुंदर आहे. विकास हा व्यावसायिक असून चेतना ही गृहिणी आहे. ती अनेकवेळा आयपीएलच्या मॅचेस पाहायला येते. चेतना ही सेलिब्रेटी नसली तरी तिने तिला खूप छान मेन्टेन ठेवले आहे. 

 

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीविराट अनुष्का लग्न