आयपीएलमध्ये काल बंगळुरु विरुद्ध हैदराबाद सामना झाला. सामन्यावेळचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातच एका व्हिडिओने लक्ष वेधलं आहे. हा सामना पाहण्यासाठी अनुष्का शर्माही (Anushka Sharma) आली होती. विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजी करत असताना त्याच्या हेल्मेटला चेंडू लागतो. तेव्हाची अनुष्का शर्माची रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शुक्रवारी बंगळुरु विरुद्ध हैदराबाद सामना रोमांचक झाला. विराट कोहलीने २५ चेंडूंमध्ये ४३ रन केले आणि तो आऊट झाला. त्याने सात चौकार आणि एक षटकार मारला. यावेळी स्टँडमध्ये अनुष्का शर्माही नवऱ्याला चिअर करण्यासाठी बसली होती. दरम्यान सामना सुरु असताना विराट कोहलीच्या हेल्मेटवर चेंडू लागला. कोहलीने संयम राखला आणि पुन्हा खेळायला सुरुवात केली. मात्र जेव्हा बॉल लागला तेव्हाची अनुष्का शर्माची रिअॅक्शन व्हायरल होत आहे. तिला कोहलीची चिंता वाटली असं तिच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत आहे.
विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी सामन्याला चांगली सुरुवात केली होती. मात्र हैदराबादने बंगळुरुवर ४२ धावांनी विजय मिळवला. आरसीबी संघ १९.५ ओव्हरमध्येच १८९ धावांवर ऑल आऊट झाला. हर्ष दुबेने विराट कोहलीची विकेट घेतली आणि आरसीबीला पहिला धक्का दिला.