Join us

प्रेग्नेंट अनुष्का शर्मा करतेय शीर्षासन, विराट कोहली अशी करतोय तिची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 13:39 IST

आता अनुष्काने इन्स्टाग्रामवर तिचा योगा करतानाचा फोटो शेअर केला आहे.

अनुष्का शर्मा तिची प्रेग्नेंसी सध्या एन्जॉय करते आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो ती पोस्ट करत असते. आता अनुष्काने इन्स्टाग्रामवर तिचा योगा करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्यासोबत विराट कोहलीसुद्धा दिसतोय. अनुष्काचा हा फोटो जुना असल्याचे तिने सांगितले आहे.  

फोटो शेअर करताना अनुष्काने लिहिले, हा व्यायाम सर्वात कठीण आहे. माझ्या आयुष्यात योग खूप महत्वाचा आहे. माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले की मी गरोदरपणापूर्वी असे सर्व आसन करू शकतो. शीर्षासन  मी बर्‍याच वर्षांपासून करत आहे, मी काळजी घेतो की मी भिंतीचा सपोर्ट घेते आणि हो माझा पतीदेखील  माझ्या सुरक्षिततेची काळजी घेतो.'

अनुष्काने पुढे लिहिले की, 'मी हे माझ्या योग शिक्षकांच्या देखरेखीखाली करीत होतो. मी गरोदरपणातही योगा करत असल्याचा मला आनंद आहे. चाहत्यांसह बॉलिवूड सेलेब्सही या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. अनुष्काने फोटो शेअर करताच तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सात महिन्यांची गर्भवती असलेल्या अनुष्काने एका प्रोजेक्टसाठी शूटींग केले. अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती झिरो सिनेमात दिसली होती. याशिवाय तिची निर्मिती असलेली वेबसीरिज पाताल लोक आणि बुलबुल चित्रपट रिलीज झाली आहे.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली