Join us
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी अनुष्का शर्माला मुंबई विमानतळावर रिसिव्ह करायला पोहोचला पती विराट कोहली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 17:12 IST

आगामी ‘सुई धागा’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण करून परतलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा मायदेशी परतली आहे. जेव्हा ती मुंबईत पोहोचली ...

आगामी ‘सुई धागा’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण करून परतलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा मायदेशी परतली आहे. जेव्हा ती मुंबईत पोहोचली तेव्हा विराट कोहली एका चांगल्या पतीप्रमाणे पत्नी अनुष्काला विमानतळावर रिसिव्ह करायला पोहोचला. ‘परी’ या चित्रपटाच्या रिलीजवेळी अनुष्का भारतात नव्हती. ती अभिनेता वरुण धवन याच्यासोबत आगामी ‘सुई धागा’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी विदेशात गेली होती. अनुष्का मुंबईत परताच विमानतळावर तिला रिसिव्ह करण्यासाठी स्वत: विराट पोहोचला. त्याने तिला मिठी मारली. या दोघांचे काही फोटो कॅमेºयात कैद झाले. या दोघांचे फोटो बघून तुम्हीदेखील या न्यूलीवेडेड कपलच्या प्रेमात पडाल. शुक्रवारी अभिनेत्री अनुष्का शर्माचा ‘परी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यास प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रेक्षकांना घाबरविण्यात अनुष्का यशस्वी ठरताना दिसत आहे. रिलीजच्या दोन दिवसांमध्येच चित्रपटाने १० कोटी रुपयांची कमाई केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.