Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीला भेटायला दिल्लीपर्यंत यायची ही ब्राझिलियन गर्ल!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 15:01 IST

एकेकाळी ही मॉडेल विराट कोहलीच्या प्रेमात वेडी होती. 2012 मध्ये आमिर खानच्या ‘तलाश’ या चित्रपटातून तिने डेब्यू केला होता.

ठळक मुद्देइजाबेल याआधी अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल इजाबेल लिटे एकेकाळी विराट कोहलीच्या प्रेमात वेडी होती. इजाबेल ही एक ब्राझिलियन मॉडेल. 2012 मध्ये आमिर खानच्या ‘तलाश’ या चित्रपटातून तिने डेब्यू केला होता. याच इजाबेलचा आज वाढदिवस.1 सप्टेंबर 1990 मध्ये जन्मलेल्या इजाबेलला बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे यश मिळू शकले नाही. पण टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीमुळे एकेकाळी ती चांगलीच चर्चेत आली होती.

विराटने अनुष्का शर्मासोबत लग्न केले. पण त्याआधी अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि इजाबेल या दोघींसोबत त्याचे नाव जोडले गेले होते. विराट तमन्नाच्या सौंदर्याने मोहित झाला होता.  एका जाहिरातीच्या निमित्ताने दोघांची भेट झाली होती. पण नंतर विराट व तमन्ना प्रेमात पडले.  विराट व तमन्नाच्या अफेअरच्या चर्चा सर्वत्र होत्या. पण या दोघांच्या मध्ये इजाबेल आली आणि विराट-तमन्ना वेगळे झालेत.

2012 मध्ये विराट व इजाबेलच्या अफेअरच्या चर्चा गाजू लागल्यात. दोघेही सिंगापूरमध्ये खरेदी करताना दिसले आणि त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्यात. इजाबेलच्या मित्रांचे खरे मानाल तर विराट व इजाबेल दोघेही एका जाहिरातीच्या शूटदरम्यान एकमेकांना भेटले होते. इजाबेल विराटवर प्रचंड प्रेम करायची. ती अनेकदा त्याला भेटायला दिल्लीला यायची.

एकदा खुद्द  इजाबेलने ती विराटला डेट करत होती, हे कन्फर्म केले होते. पण हे नाते फार काळ टिकू शकले नाही. 2013 मध्येच दोघेही  वेगळे झालेत. यानंतर 2017 मध्ये विराटने अनुष्का शर्माशी लग्न केले.

सध्या सर्वत्र  साऊथ स्टार विजय देवरकोंडा आणि इझाबेलाच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत.  इजाबेल याआधी अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती  पुरानी जीन्स, सिक्सटीन आणि  मिस्टर मजनू  या बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसली होती.  

टॅग्स :विराट कोहली