Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला मीडियापासून दूर ठेवण्यासाठी विरूष्काचा आटापीटा,  पर्सनल नोटसह केली ही विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 16:13 IST

उगाचच अटेन्शन नको...

ठळक मुद्देवोग मॅगझिनला अलीकडे दिलेल्या मुलाखतीत अनुष्काने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.

गेल्या 11 जानेवारीला अनुष्का शर्माविराट कोहली आई-बाबा झालेत. अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्माची बातमी विराटने लगेच सोशल मीडियावर शेअर केली होती. पण इथून पुढे विरूष्का आपल्या आणि मुलीच्या प्रायव्हरसीबद्दल विरूष्का काहीसे चिंतीत आहेत. होय, मुलीचा एकही  फोटो मीडियात येता कामा नये, यासाठी त्यांनी जीवाचा आटापीटा चालवला आहे. आता विरूष्काने एक पर्सनल नोट पाठवत, मीडिया आणि पापाराझींना यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

विरूष्काने फोटोग्राफर्स आणि मीडियाला एक पर्सनल नोट पाठवून मुलीच्या खासगी आयुष्याचा सन्मान करण्याची विनंती केली आहे. ‘इतक्या वर्षांत तुम्ही आम्हाला जे प्रेम दिले, त्यासाठी आभार. हा खास क्षण तुमच्यासोबत सेलिब्रेट करताना आम्हाला आनंद होतोय. पालक या नात्याने आमची एक सामान्य विनंती आहे. आम्ही आमच्या मुलीचे खासगी आयुष्य सुरक्षित ठेऊ इच्छितो. त्यासाठी आम्हाला तुमच्या मदत व सहकार्याची गरज आहे. तुम्हाला जो काही कॉन्टेन्ट हवा, तो मिळत राहील, याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ. मात्र असा काहीही कॉन्टेन्ट घेऊ नका, ज्यात आमची मुलगी असेन, अशी विनंती आम्ही करतो. तुम्ही आम्हाल समजून घ्याल व सहकार्य कराल, ही अपेक्षा,’ असे या पर्सनल नोटमध्ये लिहिले आहे.फोटोग्राफर विरल भयानीने विरूष्काने पाठवलेल्या या पर्सनल नोटचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.

उगाचच अटेन्शन नको...वोग मॅगझिनला अलीकडे दिलेल्या मुलाखतीत अनुष्काने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. मी व विराट आम्ही दोघेही आमच्या बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवू. आम्हाला उगाचच मिळणारे अटेन्शन अजिबात नको. आमचे मूल भविष्यात कधी सोशल मीडियावर येईल, हा सर्वस्वी त्याचा स्वत:चा निर्णय असेन, असे अनुष्का या मुलाखतीत म्हणाली होती.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली