Join us
Daily Top 2Weekly Top 5

​विराट कोहली व अनुष्का शर्माच्या लग्नात झाले भांडण! डिझाईनर व फोटोग्राफर आपसांत भिडले!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 10:20 IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गत ११ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. इटलीच्या फ्लोरेंस शहरात ...

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गत ११ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. इटलीच्या फ्लोरेंस शहरात हा विवाह सोहळा पार पडला. तीन दिवस चाललेल्या या डेस्टिनेशन वेडिंगचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. शर्मा व कोहली कुटुंबाचे अतिशय जवळचे मित्र व नातेवाईक या लग्नात सहभागी झालेत. पण कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल की,या लग्नामुळे विराट व अनुष्काचा डिझाईनर व फोटोग्राफर यांच्यात जोरदार भांडण झाले. होय, हे खरे आहे.विराट व अनुष्काचे डिझाईनर सब्यसाची मुखर्जी आणि फोटोग्राफर जोसेफ रधिक यांच्या सोशल मीडियावर जोरदार वाद झाला. आता या भांडणाचे कारण काय तर क्रेडिट. होय, क्रेडिट. त्याचे झाले असे की, अनुष्का व विराटच्या लग्नाची आॅफिशिअल अनाऊसमेंट होताच, सब्यसाची यांनी आपले डिझाईन दाखवण्यासाठी दोघांच्याही लग्नाचे फोटो त्यांच्या सोशल अकाऊंटवर शेअर केलेत. पण शेअर केल्या गेलेल्या या फोटोंना  फोटो क्रेडिट देणे त्यांना महत्त्वाचे वाटले नाही. आपण काढलेल्या फोटोंचे आपल्यालाच क्रेडिट मिळत नसल्याचे पाहून जोसेफ कमालीचे नाराज झालेत आणि मग ही नाराजी जाहीर करणारी पोस्ट त्यांनी लिहिली. अनुष्काला तिच्या लग्नाचे सगळे फोटो पोट्रेट फ्रेममध्ये हवे होते. त्यामुळे आम्ही प्रत्येक फोटो त्याच अँगलने क्लिक केला. पण मला दु:ख आहे की, सब्यसाची यांनी त्यांचे काम दाखवण्यासाठी माझ्या फोटोंचा वापर केला. त्यांनी माझ्या फोटोला फोटो क्रेडिट देणेही गरजेचे समजले नाही, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले. जोसेफ हे एक नावाजलेले  फोटोग्राफर आहेत. त्यांनी फोटोग्राफीचे अनेक पुरस्कार जिंकले आहेत.ALSO READ : अनुष्काच्या साखरपुड्याच्या अंगठीची किंमत वाचून व्हाल थक्क! पोशाख अन् दागिणेही होते तसेच खास!!सोमवारी रात्री सब्यसाची यांनी विराट व अनुष्काच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले होते. सब्यसाची यांनी  स्वत:च्या डिझाईनची माहिती या फोटोंच्या माध्यमातून दिली होती. अद्याप सब्यसाची यांनी जोसेफ यांच्या पोस्टला उत्तर दिलेले नाही. आता जोसेफ यांची नाराजी ते कसे घालवतात, ते बघूच.