Join us
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या हाती चिमुकली वामिका अन् बाबाच्या हातात बॅग्स...! विरूष्काचे एअरपोर्टवरील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 11:16 IST

डॅडी ऑन ड्युटी...! चाहत्यांनी केले विराटचे कौतुक

ठळक मुद्देअनुष्का शर्माने गेल्या 11 जानेवारीला मुलीला जन्म दिला. तिचे वामिका असे नामकरण करण्यात आले.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा चिमुकल्या वामिकाला स्वत:पासून एक क्षणही दूर करत नाही. नुकतीच अनुष्का आई झाली. अद्याप वामिकाचा चेहरा दिसलेला नाही. पण तिची झलक चाहत्यांनी पाहिलीये. काल अनुष्का व विराट कोहली एअरपोर्टवर दिसले. यावेळी वामिकाची झलक पाहायला मिळाली.

विमानतळावरील विरूष्काचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत अनुष्काच्या हातात वामिका आहे तर विराट सर्व बॅग्स सांभाळताना दिसतोय. इंग्लंड विरूद्धच्या टी-20 सीरिजसाठी विराट कोहली अहमदाबादला गेला होता. अनुष्का व वामिकाही त्याच्यासोबत होते. आता टीम इंडिया पुढच्या मॅचसाठी पुण्याला रवाना झाली आहे. यादरम्यान विरूष्काला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले.

चिमुकल्या वामिकाला अनुष्काने अगदी छातीशी कवटाळून घेतले आहे. साहजिकच मीडियापासून तिचा चेहरा लपवणे हा अनुष्काचा उद्देश आहे. कोणत्याही फोटोत वामिकाचा चेहरा येणार नाही, याची तिने पूरेपूर काळजी घेतली आहे. विराटच्या दोन्ही हातात मोठमोठ्या बॅग व  बेबी स्ट्रालर आहे. विराट ज्या प्रकारे पित्याचे कर्तव्य बजावतोय, ते पाहून अनेक चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.

अनुष्का शर्माने गेल्या 11 जानेवारीला मुलीला जन्म दिला. तिचे वामिका असे नामकरण करण्यात आले. 1 फेबु्रवारीला अनुष्काने मुलीच्या जन्मानंतरचा तिचा पहिला फोटो शेअर करत तिच्या नावाचा खुलासा केला होता. अर्थात या फोटोत वामिकाचा चेहरा दिसला नव्हता. याचे कारण म्हणजे, विरूष्काने वामिकाला सोशल मीडिया व जगापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली