Join us

विरूष्काने दिली आणखी एक ‘गुड न्यूज’, हा गोड फोटू ठरला सर्वाधिक लाईक्स मिळवणारा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 10:49 IST

2020 या वर्षात सर्वाधिक लाईक्स मिळवणारा फोटो तुम्ही पाहिलात का?

ठळक मुद्देविराट-अनुष्का शर्मा प्रथमच आई-वडील होणार आहेत आणि अनुष्काच्या बाळंतपणासाठी विराटने रजा मागितली. बीसीसीआने कर्णधाराच्या या निर्णयाचा आदर करताना ही सुट्टी मान्य केली.

बॉलिवूड व क्रिकेट जगतातील सर्वाधिक लोकप्रिय कपल म्हणजे विराट कोहली -अनुष्का शर्मा. या कपलची फॅन फॉलोइंग सतत वाढते आहे. यावर्षी ऑगस्टमध्येच अनुष्का व विराटने सोशल मीडियावर आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली होती. आता या कपलने चाहत्यांना आणखी एक गुडन्यूज दिली आहे. ती काय तर या कपलचा फोटो ट्विटरवर 2020 या वर्षात सर्वाधिक लाईक्स मिळवणारा फोटो ठरला आहे.

आयपीएल सुरु होण्यापूर्वी 27 ऑगस्ट 2020 रोजी  विराटने अनुष्कासोबतचा एक गोड फोटो ट्विटरवर शेअर केला होता. शिवाय यासोबत एक गोड बातमी दिली होती. आपण बाबा बनणार असल्याची गुडन्यूज या फोटोसोबत त्याने दिली होती. ‘जानेवारी 2021 पासून आम्ही दोनाचे तीन होणार...’असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले होते.

या फोटोत अनुष्काने काळ्या रंगाचा पोल्का डॉट असलेला ड्रेस घातला होता तर विराट तिच्या मागे उभा होता. या फोटोतील दोघांच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता. विरूष्काचा हा फोटो तुफान व्हायरल झाला होता. यावर लोकांनी कमेंट्स व लाईक्सचा वर्षाव केला होता. ट्विटर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार 6.27 लाख लोकांनी हा फोटो व या ट्विटला लाईक केले होते. हाच फोटो आणि विराटचे हेच ट्विट यावर्षीचे सर्वाधिक पसंती मिळालेले ट्विट ठरले आहे. या पोस्टनंतर अनुष्काने बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे अनेक फोटो शेअर केलेत. या प्रत्येक फोटोत तिच्या चे-यावरचा प्रेग्नंसी ग्लो स्पष्ट दिसतोय.

विराटची रजाविराट-अनुष्का शर्मा प्रथमच आई-वडील होणार आहेत आणि अनुष्काच्या बाळंतपणासाठी विराटने रजा मागितली. बीसीसीआने कर्णधाराच्या या निर्णयाचा आदर करताना ही सुट्टी मान्य केली. पण, विराटच्या या निर्णयावर नेटिझन्समध्ये जुंपली होती.विराटने ‘राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्या’ऐवजी कुटुंबाला प्राधान्य दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले होते. अनेकांनी तर विराटला महेंद्रसिंग धोनीच्या त्यागाची आठवण करून दिली होती. 2015च्या वर्ल्ड कप साठी धोनी दौ-यावर होता आणि त्याचवेळी मायदेशात असलेल्या पत्नी साक्षीची प्रसुती झाली आणि झिवाचा जन्म झाला होता. मुलीच्या जन्मानंतर लगेच भारतात परतण्याऐवजी धोनीने संघाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आणि मालिकेमधील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतरच मायदेशात परतला होता, याचे नेटक-यांनी विराटला स्मरण करून दिले होते.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली