Join us

विरूष्काच्या नेमप्लेटवर वामिकाचेही नाव, अहमदाबादेतील ‘त्या’ फोटोची सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 15:32 IST

अनुष्का शर्मा व विराट कोहलीची लेक वामिका सध्या जाम चर्चेत आहे. अद्याप वामिकाचा चेहरा दिसला नाही. पण वामिकाची चर्चा दूर अहमदाबादेत होताना दिसतेय.

ठळक मुद्देअनुष्का शर्माने गेल्या 11 जानेवारीला मुलीला जन्म दिला. तिचे वामिका असे नामकरण करण्यात आले.

अनुष्का शर्माविराट कोहलीची लेक वामिका सध्या जाम चर्चेत आहे. अद्याप वामिकाचा चेहरा दिसला नाही. पण वामिकाची चर्चा दूर अहमदाबादेत होताना दिसतेय. होय, भारतीय क्रिकेट टीम सध्या अहमदाबादेत इंगलविरोधात टी-20 सीरिज खेळतेय. अहमदाबादेत ज्या हॉटेलमध्ये विराट कोहली थांबलाय, त्या हॉटेलच्या रूमच्या दरवाज्याबाहेरची नेम प्लेट सध्या चर्चेत आहे.

अहमदाबादेतील या हॉटेलने भारतीय संघाला घरासारखे वातावरण देण्याचा निर्णय घेतला आणि नेमप्लेटची कल्पना समोर आली. खेळाडूंना रूम नंबर देण्याऐवजी, प्रत्येकाच्या रूम बाहेर नेमप्लेट लावली गेली. सोबत रूमचे डिझाईनही बदलण्यात आले. रूममध्ये जाताच, घरासारखा फिल यावा, यासाठी हा बदल केला गेला. कॅप्टन विराट कोहलीच्या रूमबाहेरची नेमप्लेट अशावेळी लक्षवेधी ठरली. या नेमप्लेटवर सर्वात वर विरूष्काच्या लेकीचे म्हणजेच वामिकाचे नाव आहे, मग अनुष्काचे आणि खाली विराटचे नाव आहे. सोशल मीडियावर सध्या या नेमप्लेटचे फोटो व्हायरल होत आहेत.

अनुष्का शर्माने गेल्या 11 जानेवारीला मुलीला जन्म दिला. तिचे वामिका असे नामकरण करण्यात आले. 1 फेबु्रवारीला अनुष्काने मुलीच्या जन्मानंतरचा तिचा पहिला फोटो शेअर करत तिच्या नावाचा खुलासा केला होता. अर्थात या फोटोत वामिकाचा चेहरा दिसला नव्हता. याचे कारण म्हणजे, विरूष्काने वामिकाला सोशल मीडिया व जगापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली