सलमान खानचे असंख्य चाहते आहेत. त्याचमुळे सलमान दिसला रे दिसला की, लोक त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी वेडे होतो. अशावेळी चाहते असे काही वागतात की, भाईजानचा पारा चढतो. अलीकडे असेच काही झाले. त्याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. अलीकडे सलमान एका इव्हेंटमध्ये पोहोचला. त्याचदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत सलमान मीडिया आणि चाहत्यांनी वेढलेला दिसतोय. बॉडीगार्ड्सच्या गराड्यात सलमान शांतपणे चालत असताना अचानक एक फिमेल फॅन मागून येते आणि सलमानचा हात धरून काहीतरी बोलते.
सलमान तिचे बोलणे ऐकतो आणि लगेच हसून पुढे निघतो. मात्र ती चाहती इथेच थांबत नाही तर ती सलमानचा हात खेचून त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करते. चाहतीच्या या अनपेक्षित वागण्याने सलमानचा पारा चढतो. अर्थात राग अनावर होऊनही तो संयम ठेवतो. त्या तरूणीकडे रागाने कटाक्ष टाकत तो पुढे निघतो.