बॉलिवूड स्टार्सचे चाहते आपल्या लाडक्या फिल्म स्टारसाठी कुठल्या थराला जातील, हे सांगता येत नाही. आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी चाहते क्रेजी होतात. अनेकदा हद्द पार करतात. अलीकडे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला असाच काही अनुभव आला. होय, नवाजला चाहत्यांनी असे काही घेरले की, तो अगदी पडता पडता बचावला. नवाजला समोर पाहून अनेक चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली. या गर्दीत अक्षरश: धक्काबुक्की सुरु झाली. इतके कमी की काय म्हणून, एका चाहत्याने चक्क नवाजच्या गळ्यात हात घालून त्याला आपल्याकडे खेचले. चाहत्याच्या या अनपेक्षित वागण्यामुळे नवाज अगदी पडता पडता बचावला. यानंतर लगेच बाऊंसरनी गर्दीला मागे सारत, मोर्चा सांभाळला आणि नवाजला बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.
VIDEO: क्रेजी चाहत्याने केले असे काही, पडता पडता थोडक्यात बचावला नवाजुद्दीन सिद्दीकी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 13:38 IST
बॉलिवूड स्टार्सचे चाहते आपल्या लाडक्या फिल्म स्टारसाठी कुठल्या थराला जातील, हे सांगता येत नाही. आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी चाहते क्रेजी होतात. अनेकदा हद्द पार करतात. अलीकडे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला असाच काही अनुभव आला.
VIDEO: क्रेजी चाहत्याने केले असे काही, पडता पडता थोडक्यात बचावला नवाजुद्दीन सिद्दीकी!!
ठळक मुद्देनवाजुद्दीन सध्या ‘रात अकेली’ या चित्रपटाचे शूटींग करतोय. या चित्रपटात नवाज एका पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे.