Join us

OMG! हुबेहूब शाहरूख खान; फोटो पाहून बसेल आश्चर्याचा धक्का !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 11:05 IST

आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांचे डुप्लिकेट तुम्ही पाहिले असतील. आता किंगखान शाहरूख खानच्या डुप्लिकेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ठळक मुद्देतूर्तास विरल भयानीने शेअर केलेल्या अकरमच्या फोटोंवर चाहत्यांच्या एकापेक्षा एक भारी कमेंट पाहायल मिळत आहेत.

चित्रपटांत, मालिकेत एक वा एकापेक्षा जास्त डुप्लिकेट असणे काही नवे नाही. पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र डोळ्यांनी दिसल्याशिवाय विश्वास बसत नाही. आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांचे डुप्लिकेट तुम्ही पाहिले असतील. आता किंगखान शाहरूख खानच्या डुप्लिकेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. होय, प्रसिद्ध फोटो जर्नलिस्ट विरल भयानी यांनी त्यांच्या सोशल अकाऊंटवर शाहरूखसारख्या हुबेहूब दिसणा-या व्यक्तीचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर झालेत आणि बघता बघता व्हायरल झालेत. शाहरुखची कार्बन कॉपी असलेली ही व्यक्ती जॉर्डनमधील आहे.

अगदी पाहताक्षणी हा शाहरूख आहे, असेच सगळ्यांना वाटेल. पण जरा लक्षपूर्वक पाहिले की, हा शाहरूख नसून दुसराच कुणी असल्याचे समजते.जॉर्डनमध्ये राहणा-या व शाहरूखचा डुप्लिकेट म्हणून मिरवणारी ही व्यक्ती पेशाने फोटोग्राफर आहे. Akram-al-Issawi असे त्याचे नाव.

अकरम शाहरूखसारखा दिसत असल्याने तो जिथे जाईल तिथे लोक त्याच्याभोवती गराडा घालतात. अनेक स्थानिक वाहिन्यांनी त्याची मुलाखतही घेतली आहे. पण अकरमला तो शाहरूखसारखा दिसतो, हे ऐकणे आवडत नाही. ‘मी अभिनेत्यासारखा दिसतो याचा मला आनंद आहे. पण शाहरूखसारखा दिसतो, असे कुणी म्हटले की मला आवडत नाही, असे अकरम म्हणतो.तूर्तास विरल भयानीने शेअर केलेल्या अकरमच्या फोटोंवर चाहत्यांच्या एकापेक्षा एक भारी कमेंट पाहायल मिळत आहेत. काही लोकांनी ‘हुबेहूब शाहरूख खान’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी ही व्यक्ती शाहरूखच्या ‘फॅन 2’मध्ये काम करू शकतो, असा सल्ला दिला आहे. काहींनी मात्र अकरमला ‘सस्ती कॉपी’ असे संबोधले आहे.

 

टॅग्स :शाहरुख खान