Join us

LOVE IS IN THE AIR! ताराला विसरून विनोद मेहरा यांचा मुलगा पडला ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 08:00 IST

आधी रोहन व अभिनेत्री तारा सुतारियाच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. आता रोहन एका नव्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याचे कळतेय.

ठळक मुद्देसोनालीआधी रोहन तारा सुतारियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण हे रिलेशनशिप फार काळ चालले नाही.

अभिनेते विनोद मेहरा यांचा मुलगा रोहन मेहरा याने ‘बाजार’ या चित्रपटातून डेब्यू केला. ‘बाजार’ आपटला आणि रोहन मेहराचा डेब्यू फसला. तूर्तास रोहनने कुठल्याही नव्या चित्रपटाची घोषणा केलेली नाही. पण हो,  रिलेशनशिपमुळे मात्र तो जाम चर्चेत आहे. आधी रोहन व अभिनेत्री तारा सुतारियाच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. अर्थात काहीच दिवसांत दोघांचे ब्रेकअप झाले. आता रोहन एका नव्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याचे कळतेय. होय, रोहन व  प्यार का पंचनामा फेम अभिनेत्री सोनाली सहगल यांच्या अफेअरच्या चर्चा सध्या जोरात आहेत.

(रोहन व तारा सुतारिया)

सूत्रांचे मानाल तर एका श्रीलंकन कसिनो मालकाने यंदाचा व्हॅलेन्टाईन डे एका खास पद्धतीने साजरा केला. काही फ्रेश कपल्स या सेलिब्रेशनमध्ये सहभागी व्हावेत, अशी या कसिनो मालकाची इच्छा होती. त्यानुसार रोहन व सोनाली या व्हॅलेन्टाईन डे सेलिब्रेशनमध्ये   सहभागी झालेत. या सेलिब्रेशनमध्ये करण सिंग ग्रोव्हर व बिपाशा बासू हे दोघेही सहभागी झाले होते. तथापि मीडियाला या इव्हेंटपासून दूर ठेवण्यात आले.

(सोनाली सहगल )

सोनालीला याबद्दल विचारले असता तिने अशा कुठल्याही इव्हेंटमध्ये सहभागी झाल्याचे स्पष्टपणे नाकारले. मी व रोहन केवळ दोन-तीनदा भेटलो आहोत, असेही तिने स्पष्ट केले.

(रोहन )

सोनालीआधी रोहन तारा सुतारियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण हे रिलेशनशिप फार काळ चालले नाही. यानंतर ताराचे नाव सिद्धार्थ मल्होत्रासोबत जोडले गेले आणि आता ताराचे नाव आदर जैनसोबत जोडले जातेय. आदरचा भाऊ अरमान जैनच्या लग्नात तारा पूर्णवेळ मिरवताना दिसली. अलीकडे अनेकदा आदर व तारा एकमेकांसोबत स्पॉट झालेत.

टॅग्स :रोहन मेहराविनोद मेहरातारा सुतारिया