Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! Cut म्हटलं तरी थांबलेच नाहीत, माधुरीच्या ओठांवर किस करत राहिले विनोद खन्ना अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:32 IST

Cut म्हटल्यानंतरही माधुरी दीक्षितला किस करत राहिले विनोद खन्ना, अभिनेत्रीच्या ओठांचाच घेतलेला चावा

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित आजही तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करते. तिच्या सौंदर्याची भुरळ विनोद खन्नांनाही पडली होती. एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाने कट म्हटलं तरी ते माधुरीला किस करत राहिले. याची प्रचंड चर्चाही रंगली होती. या किसिंग सीनमुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यातही अडकला होता. 

१९९८ साली माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांचा दयावान हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील 'आज फिर तुमपे प्यार आया है' हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. या सिनेमात माधुरी आणि विनोद खन्नांचा एक इंटिमेट सीन होता. पण, या सीनच्या शूटिंगदरम्यान विनोद खन्ना भान हरपले होते. दिग्दर्शकाने cut म्हटल्यानंतरही ते माधुरीला किस करत राहिले. इतकं की यामध्ये त्यांनी माधुरीच्या ओठांचा चावा घेतल्याचंही बोललं जात होतं. तेव्हा माधुरी दीक्षित अवघ्या २० वर्षांची होती. 

विनोद खन्ना माधुरी दीक्षितला ५ मिनिटं किस करत राहिले. त्यांनी अभिनेत्रीला इतक जोरात किस केलं होतं की तिच्या ओठांतून रक्त येऊ लागलं होतं. या संपूर्ण प्रकारामुळे माधुरी प्रचंड घाबरली होती. आणि त्यानंतर अभिनेत्रीला रडूही कोसळलं होतं. दयावान सिनेमातील या किसिंग सीनची प्रचंड चर्चा रंगली होती. यामुळे विनोद खन्ना यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं होतं. 

या सिनेमाचं दिग्दर्शन फिरोझ खान यांनी केलं होतं. सिनेमातील या किसिंग सीनमुळे मोठी कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण झाली होती. त्यानंतर दयावान सिनेमातून हा सीन डिलीट केला गेला होता. तेव्हा हा सिनेमा हिट ठरला होता. 

टॅग्स :माधुरी दिक्षितविनोद खन्ना